Arun Mashetty And Abhishek Kumar Apologized to Bigg Boss Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Latest Promo: तहलका सोबतच्या वादानंतर बिग बॉससमोर अभिषेकने मागितली माफी, हात जोडत म्हणतो...

Bigg Boss 17 Latest News: 'विकेंड का वार'मध्ये, अभिषेक कुमार बिग बॉसच्या कॅमेऱ्यासमोर रडत रडत माफी मागितली आहे. सनीला बेघर करण्याचा आपला हेतू नव्हता, अशी सुद्धा त्याने प्रतिक्रिया दिली.

Chetan Bodke

Arun Mashetty And Abhishek Kumar Apologized to Bigg Boss

‘बिग बॉस १७’ (Bigg Boss 17) ची सोशल मीडियावर दिवसेंदिवस प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. यंदाच्या सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये आपआपसात क्षुल्लक कारणांवरुन वाद होताना दिसत आहे. अनेकदा 'विकेंड का वार'मध्ये, सलमानने स्पर्धकांना त्यांच्या खेळावरुन चांगलेच झापताना दिसला आहे. या आठवड्यापासून 'विकेंड का वार'चे होस्टिंग सलमान नाही तर निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर करणार आहे.

गुरुवारच्या एपिसोडमध्ये, बिग बॉसच्या घरामध्ये अभिषेक कुमार आणि तहलका म्हणजेच सनी आर्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. त्या भांडणानंतर बिग बॉसने तहलकाला घराबाहेर काढले आहे. यामुळे सर्वच स्पर्धक रडताना दिसत आहेत.

'विकेंड का वार' मध्ये, यावेळी करण जोहरने सर्वच स्पर्धकांची कानउघडणी करत सर्वांचीच शाळा घेतली. यावेळी करणने अनेक स्पर्धकांना वागण्यावरुन आणि त्यांच्या खेळण्यावरुन सर्वांचीच कानउघडणी केली. आज अर्थात शनिवारच्या 'विकेंड का वार' मध्ये सनी आर्याला करण जोहरने बिग बॉसच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे घरातून बाहेर काढले आहे.

अभिषेक कुमार आणि अरुण मशेट्टी यांच्यामध्ये काही कारणास्तव जोरदार वाद होतो. त्या दोघांच्याही वादामध्ये, तहलका म्हणजेच सनी आर्या उडी मारतो. संतापलेल्या सनीने अभिषेकची कॉलर पकडली आणि अभिषेकला कानाखाली मारण्याची धमकी दिली होती. बिग बॉसच्या घरातील नियम मोडल्यामुळे तहलकाला बाहेर काढण्यात आले आहे.

'विकेंड का वार'च्या नव्या प्रोमोमध्ये, अभिषेक कुमार बिग बॉसच्या कॅमेऱ्यासमोर ओरडत रडताना दिसत आहे. करण जोहरने सनी आर्याला घराबाहेर काढल्यामुळे अनेक स्पर्धक रडताना दिसत आहे. यामध्ये, अभिषेक कुमार, अरुण मशेट्टी, मन्नारा चोप्रा, विकी जैनसह अनेकांना रडू कोसळले. अरुणने बिग बॉसकडे, हात जोडून सनीला घराबाहेर काढू नये, याची विनंती केली. सनीला बेघर करण्याचा आपला हेतू नव्हता, असे सुद्धा तो घरामध्ये म्हणाला. यावेळी त्याने माफीही मागितली.

'विकेंड का वार'मध्ये, अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारुकीच्या फ्रेंडशिपची चर्चा झाली. चर्चेमध्ये, करणने अभिषेक कुमारची चांगलीच शाळा घेतली आहे. अभिषेक नेहमीच मुनव्वरला त्यांच्यातील फ्रेंडशिपबद्दल बोलत असतो. तो नेहमीच त्याच्या मदतीला धावून येत असतो. दोघांचीही करणने चांगलीच शाळा घेतली. यावेळी इतर स्पर्धकांनाही चांगलेच खडेबोल सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT