Bigg Boss Google
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' च्या ट्रॉफीचा फर्स्ट लुक समोर; उद्या ग्रॅण्ड फिनाले, विजेतापदाची उत्सुकता शिगेला

Bigg Boss 17 Grand Finale: उद्या 'बिग बॉस 17' चा ग्रॅण्ड फिनाले आहे. त्याअगोदर ट्रॉफीचा फर्स्ट लुक समोर आलाय. विजेतापदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss 17 trophy First look

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17 finale) लवकरच संपणार आहे. 28 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रॅण्ड फिनाले एपिसोडसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. 'बिग बॉस 17' च्या निर्मात्यांनी विजेत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्रॉफीचा फर्स्ट लुकचं अनावरण केलंय. (latest entertainment news)

ट्रॉफीसाठी अटीतटीचा सामना

बिग बॉसने एक नवीन प्रोमो जारी केला ज्यामध्ये 'बिग बॉस 17' ट्रॉफी (Bigg Boss 17) दर्शविली गेली. टॉप 5 फायनलिस्ट अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोपडा आणि अरुण मशेट्टी यांच्यात ट्रॉफीसाठी अटीतटीचा सामना होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिग बॉस 17 ची ट्रॉफी

बिग बॉस 17 ची ट्रॉफी (Bigg Boss 17 trophy) पूर्णपणे 'दिल दिमाग, दम' या शोची थीम लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ट्रॉफीची रचना तीन खोल्या आणि बिग बॉसच्या घराचा सार दर्शवते. ही ट्रॉफी केवळ अंतिम विजेत्याला देण्यात येणार आहे.

बिग बॉस 17' ची बक्षीस रक्कम

'बिग बॉस 17' च्या या सीझनची बक्षीस रक्कम 30 ते 40 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. विजेत्याला एक कार देखील मिळणार आहे. निकाल 28 जानेवारी रोजी ग्रँड फिनालेच्या रात्री घोषीत केला जाणार (Bigg Boss 17) आहे. फिनालेमध्ये जुन्या स्पर्धकांचे डान्सही पाहायला मिळणार आहेत. याची झलक प्रोमोमध्ये समोर आली आहे.

बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले

इंडस्ट्रीतील काही खास पाहुणे स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये येणार आहेत. त्यामुळे हा भाग खूपच भावूक होणार (Bigg Boss 17 finale) आहे. याचा प्रोमो रिलीज झाला आहे. बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले 28 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. आपण कलर्स चॅनलवर आणि इंटरनेटद्वारे जिओ सिनेमा ॲपवरही हा फिनाले पाहू शकतो. ॲपवर आपल्या लाडक्या स्पर्धकासाठी मतदान करण्याचा पर्यायही मिळणार आहे.

अभिषेक, अंकिता आणि मुनव्वर हे स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. आपल्या आवडत्या स्टारला विजय मिळवून देण्यासाठी या पाचही जणांचे चाहते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT