Vicky Jain And Munawar Faruqui Fight: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: Vicky Jain आणि Munawar Faruqui मध्ये कडाक्याचे भांडण, कॉमेडियनने अंकिताच्या नवऱ्याचा गळा पकडला; VIDEO व्हायरल

Vicky Jain And Munawar Faruqui Fight: नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqi) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यामध्ये हे भांडण झाले असून मुनव्वर थेट विकीचा गळा पकडता दिसतो.

Priya More

Bigg Boss 17 Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'चा (Bigg Boss 17) ग्रँड फिनाले जवळ आला आहे. येत्या २८ तारखेला बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले होणार आहे. याच दिवशी बिग 17 ला विनर मिळणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरातील सदस्य या शोची ट्रॉफी जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. हे सर्व सदस्य शक्य तितके प्रयत्न करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशातच नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqi) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यामध्ये हे भांडण झाले असून मुनव्वर थेट विकीचा गळा पकडता दिसतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉस 17 च्या आगामी भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये टॉर्चर टास्कची टीम बी म्हणजेच अंकिता लोखंडे, विकी जैन, आयशा खान आणि ईशा मालवीय स्वयंपाकघरातील सर्व मसाले लपवण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. तिघे मिळून तिखट, गरम मसाला, मीठ ते डिटर्जंटची पाकिटे लपवताना दिसतात. इतकंच नाही तर विकी जैन टास्कमध्ये वापरण्यात आलेल्या बादल्या छतावर फेकतो. ज्याची माहिती मुनव्वरला मिळते.

मुनव्वर विकीने छतावर फेकलेल्या बादल्या काढण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो अभिषेक आणि मन्नारा यांची मदत घेतो. हे तिघेही बादली काढण्याचा प्रयत्न करतात पण विकी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो. बादली काढण्यासाठी मुनव्वर झाडाचा आधार घेऊन चढतो आणि रॉडच्या सहाय्याने बादली काढण्याचा प्रयत्न करतो. तर विकील त्याला खाली खेचतो. त्यामुळे मुनव्वर त्याला म्हणतो मला ओढू नको. पण नंतर मुनव्वर खाली उडी घेतो. त्यानंतर विकी आणि त्याच्यामध्ये कडाक्याचे भांडण होते. मुनव्वरच्या रागाचा पारा चढतो आणि तो थेट विकीचा गळा पकडतो.

मुनव्वर आणि विकीची भांडण पाहून घरामध्ये असलेले सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये येतात. ते सर्वजण विकी आणि मुनव्वरला रोखण्याचा प्रयत्न करतात. पण मुनव्वर मागे हाटत नाही. टॉर्चर टास्क मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी हरले. या टास्कमध्ये आयशा खानने घरातील चारही सदस्यांवर लाल मिरची टाकली, जी टीम ए सहन करू शकली नाही. मन्नारा चोप्रा हिने सर्वप्रथम बजरमधून हात काढला होता. यानंतर अभिषेक कुमारलाही लाल मिरचीची जळजळ सहन झाली नाही. यामुळे चारही जण बाहेर पडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT