Bigg Boss 17 Promo Released Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Promo Released: उत्सुकता वाढली!, बिग बॉस १७ चा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित, ‘या’ तारखेपासून येणार भेटीला

Bigg Boss 17 News: लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘बिग बॉस १७’ची रिलीज डेट जाहीर झाली असून सध्या प्रोमोची प्रचंड चर्चा होतेय.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Promo Released

टेलिव्हिजनवर कायमच वादाच्या भोवऱ्यात असणारा आणि तितकाच लोकप्रिय टिव्ही शो ‘बिग बॉस’सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. लवकरच ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये शोची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून अभिनेत्याच्या लूकचीही सध्या प्रचंड चर्चा होत आहे. प्रचंड लोकप्रिय असलेल्या या शोमध्ये, प्रेक्षकांना मनोरंजन, ड्रामा आणि वादविवाद सर्वच पहायला मिळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस’चे काही प्रोमो बरेच चर्चेत आले आहेत. या शेअर केलेल्या प्रोमोंमुळे सलमानने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवलेली आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान वेगवेगळ्या रुपात दिसून येत आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्या अनोख्या आणि रंजक लूकमध्ये या भाईजान चाहत्यांना शोची ओळख करुन देत आहे.

व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी शोची रिलीज डेटही जाहीर केली आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून हा शो कलर्स टिव्हीवर टेलिकास्ट केला जाणार आहे. प्रोमोमध्ये भाईजान बोलतो, ‘यावेळी होणार प्रेमाची टेस्ट, कोणाचा होणार जय तर कोणाचा होणार पराजय’, असे कॅप्शन निर्मात्यांनी दिले आहेत.

पुढे प्रोमोमध्ये सलमान बोलतो, बिग बॉसमध्ये घरातील सदस्यांना प्रेमाच्या काही कठीण परीक्षा द्याव्या लागणार आहेत. तर बिग बॉस त्याला सांगतात की, यंदाच्या सीझनला घरामध्ये त्यांचे आवडते स्पर्धक असणार आहेत.

‘बिग बॉस १७’चा प्रीमियर १५ ऑक्टोबर रोजी होणार असून प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता तर शनिवार-रविवार रात्री 9 वाजता कलर्स टीव्हीवर शो प्रसारित होणार आहे. तर Jio Cinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २४ तास घरातील लाईव्ह अपडेट चाहत्यांना पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT