Samarth Jurel Eliminated Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला समर्थ जुरेल, ढसाढसा रडली ईशा मालवीय; VIDEO व्हायरल

Priya More

Samarth Jurel Eliminated:

'बिग बॉस 17' शो (Bigg Boss 17) सध्या चांगलाच रंगतदार होत चालला आहे. नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये भारती सिंग (Bharati Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) या कपलने एन्ट्री करत घरातील सदस्यांसोबत मजा केली. या एपिसोडमध्ये एक इमोशनल अँगलही पाहायला मिळाला. यावेळी या कपलने सर्वांना हसवले खरं. पण जेव्हा हे कपल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले त्यानंतर बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना बोलावून समर्थ जुरेलला (Samrth jurel) घराबाहेर जावे लागणार असल्याचे जाहीर केले. समर्थला घराबाहेर जावं लागणार हे ऐकून घरातील सर्व सदस्यांना धक्का बसलोत. समर्थ हसतमुखाने घरातून निघून जातो. पण समर्थ घराबाहेर गेल्यामुळे ईशा मालवीय ढसाढसा रडली.

बिग बॉसने या शोमध्ये जरा ट्वीस्ट आणला. सोमवारच्या एपिसोडमध्येच बिग बॉसच्या घरातून एका सदस्याला घराबाहेर जावं लागलं. यावेळी समर्थ जुरेलला घराबाहेर पडला. समर्थ घराबाहेर जाताना घरातील सर्व सदस्य खूपच नाराज झाले. काहींना रडू आवरले नाही. यावेळी मन्नारा समर्थांची स्तुती करते आणि म्हणते, 'तू खूप गोड मुलगा होतास आणि मला तुझी आठवण येईल.' विकीने त्याला शोचा सर्वात मोठा एंटरटेनर म्हटले. अंकिता आणि सर्वांनी समर्थांना मिठी मारली. तर अभिषेकने समर्थला सॉरी म्हटले. समर्थ जाताना ईशा ढसाढसा रडली.

काही आठवड्यांपूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये समर्थ, ईशा आणि अभिषेक यांच्यात वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरामध्ये अभिषेकने समर्थला चापट मारली होती. अभिषेकला चिथावणी दिल्याबद्दल सलमान खानने समर्थांवर टीका करत म्हटले की, 'समर्थला चापट मारल्यानंतर अभिषेक बाहेरच्या जगात हिरो बनला आहे.' समर्थ आणि ईशाच्या या वागण्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली. 'वीकेंड का वार'मध्येही करण जोहरने ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलला फटकारले होते.

समर्थ जुरेल गेल्यानंतर ईशा मालवीय खूप रडली. यावेळी ती म्हणाली की, तिला बिग बॉस 17 च्या घरात एकटे वाटत आहे. अंकिता लोखंडेने तिचे सांत्वन केले आणि मी तुझ्यासोबत राहणार असल्याचे सांगितले. समर्थ कॅप्टन असता तर तो सुरक्षित राहिला असता असेही अंकिता म्हणाली. समर्थ बाहेर पडल्यानंतर मुनाव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार दुसऱ्या दिवशीच्या घटनेबद्दल चर्चा करताना दिसले. यावेळी त्यांनी अभिषेकने समर्थला चापट मारल्याचा देखील उल्लेख केला आहे. या घटनेमुळेच समर्थला कमी वोट मिळाल्याचे मत मुनव्वरने व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : आजपासून या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Horoscope Today : नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, जोडीदाराची भेट होईल, आज तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

SCROLL FOR NEXT