Ankita Lokhande And Vicky Jain Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: मला तुझ्यासोबत परत घरी नाही जायचं, अंकिता लोखंडेने विकी जैनकडे पुन्हा केली घटस्फोटाची मागणी

Ankita Lokhande And Vicky jain Talked About Divorced: रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेने अनेक वेळा विकी जैनपासून वेगळे होण्याबद्दल बोलली आहे. नुकताच समोर आलेल्या एपिसोडमध्ये अंकिताने आयशा खानसमोर घटस्फोट घेतल्याची चर्चा केली आहे.

Priya More

Bigg Boss 17 Episode:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिचा पती बिझनेसमन विकी जैनसोबत (Vicky Jain) एन्ट्री घेतली होती. या शोमध्ये आपल्यानंतर पहिल्या आठवड्यात अंकिता आणि विकीमध्ये खूप प्रेम पाहायला मिळाले. पण हळूहळू आता त्यांच्या नात्यामध्ये दूरावा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये सतत भांडणं, रुसवे-फुगवे पाहायला मिळत आहेत.

अंकितावर विकीचा गेम खराब केल्याचा आणि विकीवर अंकिताचा गेम खराब केल्याचाआरोप करण्यात आला आहे. यामुळे दोघंही बिग बॉसच्या घरामध्ये व्यवस्थित राहावे आणि त्यांचं नातं टिकावं यासाठी दोघांच्या देखील आई आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी देखील भांडण न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पुन्हा त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण अंकिता पुन्हा विकीसोबत घटस्फोट घेण्याबाबत बोलत आहे.

रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडेने अनेक वेळा विकी जैनपासून वेगळे होण्याबद्दल बोलली आहे. नुकताच समोर आलेल्या एपिसोडमध्ये अंकिताने आयशा खानसमोर घटस्फोट घेतल्याची चर्चा केली आहे. विकी जैन, अंकिता लोखंडे आणि आयेशा सिंग लग्नाविषयी बोलत होते. यादरम्यान विकी लग्नावर आपले मत मांडतो. तो म्हणतो, 'विवाहित पुरुष कधीही ही गोष्ट मान्य करू शकत नाही की त्याला किती वेदना होतात.' यावर आयशा खान म्हणते की, 'मला कधीच लग्न करायचे नाही आणि याचे कारण माझे वडील आहेत.' या संपूर्ण संभाषणानंतर अंकिता विकीला विचारते की, 'तू आयशाला असे का बोलला?' तेव्हा विकी म्हणतो, 'मला कसे वाटते ते मी कधीच सांगू शकत नाही. विवाहित व्यक्ती...विशेषतः पुरुषांना या परिस्थितीचा त्रास होतो.'

पण विकी जैनच्या बोलण्यामुळे अंकिता लोखंडेला प्रचंड राग येतो आणि ती संतापते. यावेळी अंकिता थेट घटस्फोटाबाबत बोलते. जे ऐकून आयेशा खानही थक्क झाली. अंकिता म्हणते, 'तू एवढ्या अडचणीत आहेस तर माझ्यासोबत का आहेस. चल घटस्फोट घे, मला तुझ्यासोबत घरी परत जायचं नाही.' अंकिता हे गंभीरपणे बोलत नाही. पण ती तिथून रागाने निघून जाते. याआधीही दोघांनी घटस्फोटाची चर्चा केली होती. अंकिताने विकीवर तिचा गैरफायदा घेतल्याचा आरोप देखील केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT