छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'मध्ये (Bigg Boss 17) कधी काय होईल हे कोणालाच माहीती नसते. बिग बॉसचा प्रत्येक सीझन अधिकाधिक रंजक बनवण्यासाठी निर्माते शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसतात. यावेळी शोचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. इतकेच नाही तर निर्माते या सीझनमध्ये वेळोवेळी बरेच ट्विस्ट घेऊन येत आहेत. ज्यामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना मोठा झटका लागल्याशिवाय राहत नाही.
अशामध्ये आता पुन्हा बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट आला आहे. सर्व सदस्यांना एका झटक्यात बेघर करण्यात येते. बिग बॉसच्या नुकताच समोर आलेल्या या प्रोमोमध्ये हे दिसत असून हा प्रोमो पाहून नेमकं बिग बॉसच्या घरात आता पुढे काय होणार आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लवकरच बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट येणार आहे. बिग बॉसच्या या सीझनमध्ये एकाच घरामध्ये तीन शेजारी आहेत. म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये तीन खोल्या आहेत. दिल का घर, दिमाग का घर आणि दम का घर. आता निर्माते एका झटक्यात सर्व सदस्यांना ही तिन्ही घरं खाली करण्याचे आदेश देतात. त्यामुळे घरातील सर्व सदस्य घाबरून जातात. या नव्या ट्विस्टमुळे बिग बॉसच्या घरात खळबळ उडते.
'बिग बॉस 17' चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये घरातील वातावरण पूर्णपणे बिघडलेले दिसत आहे. या प्रोमोमध्ये असे दिसून येत आहे की, अचानक संपूर्ण घराचे लाइट बंद होऊ लागतात आणि मग बिग बॉसकडून घोषणा होते. यादरम्यान बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्याचे घर खाली करण्यास सांगण्यात येते. स्पर्धकांना त्यांचे सामान काढण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. यानंतर घरातील सर्वजण गार्डन एरियामध्ये बसलेले दिसतात.
त्यानंतर बिग बॉस म्हणतात की, हा संपूर्ण परिसर एका खोलीमध्ये अडकला आहे. तुम्ही सर्वांनी एक मुखवटा घातलेला आहे. तुम्ही सर्वजण मिळून परिसरातील चौकात शिफ्ट व्हा. आता इथेच राहा आणि इथेच झोप. बिग बॉसची घोषणा ऐकून घरातीस सर्व सदस्य चिंतेत येतात. नेमकं काय घडत आहे हेच त्यांना कळत नाहीये. आता बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय घडलंय ते येत्या एपिसोडमध्येच कळेल.
दरम्यान, बिग बॉस 17 सुरू होऊन जवळपास सात आठवडे झाले आहेत आणि अजूनही घरात 14 स्पर्धक आहेत. शोमध्ये अनेक मोठे टीव्ही स्टार्स तसेच मोठे YouTubers आहेत. मात्र अजूनही एकही स्पर्धक व्यवस्थित खेळ खळत नाहीये. प्रत्येक जण पाठीमागे काहीना काही गेम करताना दिसत आहेत. आजपर्यंत एकही स्पर्धक फ्रंटफूटवर येऊन आपला खेळ खेळू लागला नाही. बिग बॉसच्या घरात प्रत्येक स्पर्धक एकमेकांच्या पाठीमागे बोलत असतो.
एवढेच नाही तर या सीझनमध्ये कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हे देखील प्रेक्षकांना स्पष्ट होत नाहीये. अशामध्ये सलमान खान आणि नंतर करण जोहरने या शोमध्ये स्पर्धकांचे खरे चेहरे दाखवले. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अशा परिस्थितीत आता बिग बॉसने सर्व स्पर्धकांना एकत्र बसवले आहे. आता पुढे काय होणार हे बिग बॉसच्या पुढच्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.