Ankita Lokhane And Mannara Chopra Fighting Twitter
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhane And Mannara Chopra Fighting: ‘अंकिता तू हुशार अन् अहंकारी...’, ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रामधला वाद विकोपाला

Bigg Boss 17 Latest Updates: आजच्या एपिसोडमध्ये मन्नरा चोप्रा आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये घरातील कामावरुन वाद झाला.

Chetan Bodke

Ankita Lokhane And Mannara Chopra Fighting

मराठीसह हिंदी टेलिव्हिजनसृष्टीमध्ये कायमच ‘वादग्रस्त रिॲलिटी शो’म्हणून चर्चेत राहणाऱ्या ‘बिग बॉस १७’ची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा होत आहे. पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये आपापसात वाद सुरू आहे. कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या या शोमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आजच्या एपिसोडमध्ये मन्नरा चोप्रा आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये घरातील कामावरुन वाद झाला.

एकीकडे मन्नाराने अंकितावर घरावर वर्चस्व गाजवत आहे, असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे अंकिता मन्नाराला 'बच्ची' म्हटली आहे. मन्नारा हॉलमध्ये जिग्ना व्होरा, नवीद सोले, खानजादी आणि रिंकू धवन यांच्यासोबत एकत्र बसली आहे. त्यावेळी, अंकिता येते आणि सर्वांना स्लॅब साफ करण्यासाठी सांगते. (Bigg Boss)

या कामासाठी ती रिंकू आणि जिग्नाला स्मार्ट म्हणते तर मन्नराला 'बच्ची' असं म्हणते. मी कोणालाही कामं करायला फोर्स करत नाही, तर फक्त कामं करायला आहे, असं अंकिता घरातल्या स्पर्धकांना म्हणते. अंकिता जेव्हा मन्नाराला 'बच्ची' म्हणते तेव्हा मन्नाराला तिचा खूप राग येतो. (Serial)

अंकिता मन्नाराला 'बच्ची' म्हटल्यामुळे ती रडत रडत घरात जाते. अंकिता मन्नाराला 'बच्ची' सहज म्हणते. म्हणून खानजादी मन्नराला शांत होण्यास सांगतो. हळूहळू अंकिता आणि मन्नराचा एकमेकींमधला गैरसमज दूर होतो आणि त्या एकमेकींसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात. पण यादरम्यान मन्नारा अंकितासोबत भांडते आणि अंकिताला उद्धट म्हणते. (Actress)

मन्नारा अंकिताला म्हणते, “माझ्या मते तू खूप हुशार आहेस आणि खूप अहंकारी आहेस. ईशा सोडून सर्व मुली तुझ्याबद्दल सारख्याच विचार करतात. तू प्रत्येक वेळी मला 'बच्ची' म्हणू शकत नाही.” त्यानंतर अंकिता मन्नाराची माफी मागून तिथून निघून जाते. मन्नारा आणि अंकिता यांच्यातील हा वाद सध्या खूप चर्चेत आहे. (Entertainment News)

'बिग बॉस १७' च्या घरात जिग्ना व्होरा, सना रईस खान, अनुराग डोवाल, मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे, विकी जैन, नवीद सोले, नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा, अभिषेक कुमार, ईशा मालवीय, रिंकू धवन, अरुण मशेट्टी, सनी आर्य, फिरोझा खान, सोनिया बन्सल आणि मन्नारा चोप्रा हे स्पर्धक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT