Naagin 7 In Ankita Lokhande Instagram
मनोरंजन बातम्या

Naagin 7: एकता कपूरची अंकिता लोखंडेला ऑफर, 'नागिन ७'मध्ये दिसणार मुख्य भुमिकेत?

Ekta Nagpur Famous Show: बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने तिच्या आगामी सिरीयलमध्ये 'बिग बॉस १७' फेम अभिनेत्रीची वर्णी लागणार असल्याची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Naagin 7 Show

'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. सप्टेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या या शोने प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले आहे. या शोमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी कंटेस्टंट म्हणजे अंकिता लोखंडे.

अंकिता लोखंडे एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री असून ती कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहते. 'बिग बॉस १७'नंतर अभिनेत्रीचं नशीबंच पालटलं आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिने तिच्या आगामी सिरीयलमध्ये अंकिता लोखंडेला कास्ट केल्याचे वृत्त मिळत आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार एकता कपूरची लवकरच 'नागिन ७' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप मालिकेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नुकतंच फिल्मीबिटने दिलेल्या वृत्तानुसार, एकता कपूरने तिच्या 'नागिन ७' या आगामी शोमध्ये अंकिता लोखंडेला कास्ट केले आहे. 'बिग बॉस १७' संपताच अंकिता 'नागिन ७'च्या शुटिंगसाठी जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'प्रेक्षकांची लाडकी सून' तेजस्वी प्रकाशनंतर या शोमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. एकता कपूरने तेजस्वी प्रकाशचीही आणि आता अंकिताचीही बिग बॉसच्या घरातूनच निवड केली.

'बिग बॉस १७'बद्दल सांगायचे तर, नुकतंच विकी जैन 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडला असून अंकिताने टॉप ५ कंटेस्टंटमध्ये बाजी मारली आहे. सध्या टॉप ५ मध्ये, मुनव्‍वर फारूकी, अंकिता लोखंडे, अभ‍िषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे फायनलिस्ट ठरले आहेत. सध्या प्रेक्षकांमध्ये, फायनलिस्ट कोणता स्पर्धक होणार याची जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT