Do You Know Ankita Lokhande Real Name Instagram
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande Birthday: अंकिताला अभिनेत्री व्हायचंच नव्हतं, खरं नावही तुम्हाला माहित नसेल...

Bigg Boss 17 Actress Ankita Lokhande: 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अंकिता लोखंडे आज ३९ वा वाढदिवस साजरा करतेय.

Chetan Bodke

Do You Know Ankita Lokhande Real Name

सध्या ‘बिग बॉस १७’मध्ये अंकिता लोखंडे हे नाव प्रचंड चर्चेत आहे. तिच्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळेही अंकिता लोखंडे तुफान चर्चेत आहे. १९ डिसेंबर १९८४ रोजी इंदूरमधील एका मराठी कुटुंबामध्ये अंकिताचा जन्म झाला.

अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे दोघेही ‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये एकत्रित आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अंकिता लोखंडे आज ३९ वा वाढदिवस साजरा करतेय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिलेल्या अंकिता लोखंडेचं खरं नाव तनुजा लोखंडे असं आहे. अंकिताला खरी ओळख 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून मिळाली आहे. मालिकेमध्ये तिने 'अर्चना' नावाचे पात्र साकारले होते. या शोमधून अंकिता घराघरात प्रसिद्ध झाली. अंकिताला तिच्या घरचे तनुजा म्हणून नाही तर अंकिता या नावानेच हाक मारायचे. ज्यावेळी तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले, तिने स्वतःचं नाव बदललं होतं. (Actress)

अंकिताला अभिनेत्री नाही एअर होस्टेस व्हायचे होते. पण ती, ओघाओघाने अभिनयाकडे वळाली. ज्यावेळी ती एअर होस्टेसचे शिक्षण घेत होती, त्यावेळी इंदूरमध्ये एका सिरियलसाठी ऑडिशन होते. त्यामध्ये तिची निवड झाली आणि तेव्हापासून ती अभिनयाकडे वळली. २००४मध्ये अंकिताने मॉडेलिंगमधून प्रवेश केला. अंकिताने मालिकेंसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'मणिकर्णिका' आणि 'बागी ३' मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

लाडकी बहिणीनंतर एकनाथ शिंदे लाडकी सुनबाई योजनेची घोषणा करणार का? अजितदादा म्हणाले...

Google Pixel 10 च्या लॉन्चची तारीख ठरली! जाणून घ्या फोनचे भन्नाट फीचर्स

Maharashtra Live News Update: जांभोरा येथील पाझर तलाव फुटला, शेतीचे मोठं नुकसान

Janhvi Kapoor: चंद्रावाणी मुखडा तिचा...; जान्हवी कपूरचा दहीहंडी स्पेशल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT