Ankita Lokhande And Vicky Jain Latest News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'त्याचा आवाज सहन होत नाहीये...', अंकिता पती विकीवर का आहे नाराज?; स्वत: अभिनेत्रीनं सांगितलं कारण

Ankita Lokhande's Big Statement: अंकिता लोखंडेला विकी जैनच्या कोणत्या सवयी आवडत नाही, यावर भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Ankita Lokhande And Vicky Jain Latest News

प्रसिद्धी टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) सध्या ‘बिग बॉस’मुळे प्रचंड चर्चेत आहे. हे कपल सध्या ‘बिग बॉस १७’मध्ये (Bigg Boss 17) सहभागी झाले आहे. बॉसच्या घरामध्ये या दोघांचीही एन्ट्री झाल्यापासून अंकिता आणि विकी यांच्यामध्ये चांगलाच वाद होताना दिसत आहे. त्यांच्या नात्यामध्ये सध्या दूरावा आल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या आयुष्याविषयी एक-एक खुलासे करताना दिसत आहे. नुकताच तिने लग्नानंतर विकी आणि ती एकत्र का राहत नाही यामागचे कारण सांगितले होते. नुकतेच तिने विकी जैनच्या कोणत्या सवयी आवडत नाही, यावर भाष्य केले आहे.

लेटेस्ट एपिसोडमध्ये, अंकिता आणि मुनव्वर फारुकी दोघेही एकत्र बागेमध्ये फिरत असतात. त्यावेळी अंकिता आणि मुनव्वर यांच्या लक्षात आले की, विकी जैन रिंकू धवनसोबत बोलण्यात व्यस्त आहे. यावर, अंकिता विक्कीकडे बघत म्हणाली, “विकी, हा एक किडा आहे. हा किडा जिथे राहतो ना त्याला संसर्ग होतोच. कधी कधी तो मला खूप त्रास देतो. मग मी त्याला सहज बाहेर फेकून देते.” (Bigg Boss)

ती पुढे म्हणाली, “याला बोलायला फक्त कुठला विषय मिळायला हवा, तो त्यावर खूप बोलतो. जर माझं आणि विकीचं कधी भांडण झाले ना, ते नकोनकोसं वाटतं. मला त्याचा कधीकधी आवाज सहन होत नाही. विकी प्रत्येक गोष्टीवर इतकं स्पष्टीकरण देतो की, त्याने ते मला ज्ञान देणं बंद करावं असं वाटतं. त्याच्यासोबत भांडून मी कधी थकून जाते.” (Serial)

बिग बॉसच्या घरात असताना विकी आणि अंकिता यांच्यात अनेकदा वाद झालेला आहे. विकी अनेकदा अंकितासोबत भांडताना दिसतो. “हे खूप वाईट आहे. तू मला आयुष्यात काहीच दिले नाहीस, प्लीज मला शांत राहुदे, मला लाज वाटते, ही तुझी सर्वात वाईट बाजू आहे. जी मी कधीही पाहिली नाही.”, असं विकी अंकिताला म्हणाला. तर अंकिताच्या चाहत्यांनी विकीला चांगलंच ट्रोल केलं आहे. विकी ज्या पद्धतीने अंकितासोबत वागत आहे, त्यावर त्याला चांगलेच खडेबोल सुनावले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT