Isha Malviya And Samarth Jurel Breakup Rumors Instagram
मनोरंजन बातम्या

Isha- Samarth Breakup Rumors: ईशा मालविय-समर्थ जुरेलचं ब्रेकअप? अभिनेत्याने पोस्ट शेअर करत सांगूनच टाकलं

Isha Malviya And Samarth Jurel Relation: समर्थ आणि इशाचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी समर्थला भेटण्यासाठी इशाला वेळ नसल्याने त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Isha Malviya And Samarth Jurel Breakup Rumors

'बिग बॉस १७'ला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. शोमधील सदस्य नेहमीच काही न काही कारणांनी चर्चेत असतात. शोमधील एक कपल म्हणजेच इशा मालविय आणि समर्थ जुरेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे व्हॅलेंटाइन डे. व्हॅलेंटाइन डे निमित्त समर्थने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळेच हे दोघेही चर्चेत आले आहेत. (Bigg Boss)

नुकतंच समर्थ जुरेलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामुळेच समर्थ आणि इशाचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी समर्थला भेटण्यासाठी इशाला वेळ नसल्याने त्याने ही पोस्ट शेअर केली आहे. (Televesion Actor)

समर्थने पोस्टमध्ये लिहलंय की, "काही लोक कामात इतके व्यस्त आहेत की त्यांना प्रत्येकाला भेटायला आणि पोस्ट करायला वेळ मिळतो. पण आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटायला काहींना वेळ नाही. पण जाऊद्या, तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा. तुम्हाला आणि तुमच्या साथीदाराला खूप आशिर्वाद." असं समर्थने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे. या स्टोरीनंतर सोशल मीडियावर समर्थ आणि ईशाच्या ब्रेकअपची चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. (Bollywood News)

बिग बॉसनंतर हे कपल वेगळे झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू होती. मध्यंतरी झालेल्या 'बिग बॉस १७' तल्या स्पर्धकांच्या रियुनियन पार्टीतही हे कपल एकत्र दिसले नव्हते. सध्या सोशल मीडियावर ईशा आणि समर्थचे ब्रेकअप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. चाहते म्हणतात, ईशा कधीच कोणाची मैत्रीण असू शकत नाही. तर आणखी एक युजर म्हणतो, हे होणारच होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT