Ankita Lokhande Pregnant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: मला काही तरी होतंय..., अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का?, बिग बॉसच्या घरात अभिनेत्रीने केला खुलासा

Ankita Lokhande Pregnant : अंकिताने या शोमध्ये प्रग्नेंसीबाबत संकेत दिले. नुकताच तिने प्रेग्नेंसी टेस्ट झाल्याची माहिती दिली.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain:

सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) वादग्रस्त टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' मध्ये (Bigg Boss 17) टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. अंकिताने या शोमध्ये पती विक्की जैनसोबत (Vicky Jain) एन्ट्री घेतली. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर अंकिता आणि विक्कीचे नाते चांगले होते. पण नंतर या कपलमध्ये वाद होऊ लागले आहेत. त्यांच्या नात्यात दूरावा येऊ लागला आहे. अंकिताने या शोमध्ये प्रग्नेंसीबाबत संकेत दिले. नुकताच तिने प्रेग्नेंसी टेस्ट झाल्याची माहिती दिली.

कालच्या एपिसोडमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन घराच्या एका कोपऱ्यात बसून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अंकिता लोखंडेने विक्की जैनवर तिला पाठिंबा न दिल्याचा आरोप केला आहे. तर, विक्की जैन म्हणतो की, तू माझे ऐकत नाही. जेव्हा मी तुझ्याशी कोणत्याही विषयावर बोलतो तेव्हा तू माझे ऐकत नाही किंवा समजून घेत नाही. उलट तू म्हणते, इथून निघून जा, मी तुझे ऐकणार नाही. तू असा आहेस, तू तसा आहेस. यावर अंकिता लोखंडे म्हणाली की, माझी तब्येत बरी नाही. मी आजारी आहे आणि माझा मूड बदलत आहे. माझी प्रेग्नेंसी टेस्ट झाली आहे.

अंकिता लोखंडे म्हणते, 'मला बरे वाटत नाही. मी आजारी आहे असे मला आतून जाणवते. मला अजून पाळी आलेली नाही. मला घरी जायचे आहे. मी प्रग्नेंसी टेस्टसाठी ब्लड टेस्ट देखील केली आहे. काल आणि आजही माझ्या टेस्ट झाल्या आहेत. त्यांनी माझी लघवीची टेस्टही केली आहे. माझे इमोशन्स वर-खाली होत आहेत. मी एखाद्या गोष्टीतून जात आहे आणि मला ते व्यक्त करता येत नाही. मी गोंधळले आहे आणि तुला दोष देत नाही.'

यावर विक्की जैनने तिला प्रश्न केला की, मी जेव्हा तुला काही समजावून सांगतो तेव्हाच सर्वकाही होते. तरीही तू माझ्यापासून दूर का जाते? तू माझ्यावर ओरडायला लागते. तू माझा अपमान करू लागते. यावर अंकिता म्हणते, 'गेमसाठी तुझं सर्वकाही देऊ नको. प्लीज १५ मिनिटे किंवा काही तासांसाठी तरी सामान्य पतीसारखे हो. मी हरले तरी फरक पडत नाही. मी घरी जाईन. मला त्याची चिंता नाही. मी एक इमोशनल व्यक्ती आहे. प्रॅक्टिकल नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT