Ankita Lokhande Big Allegation On Vicky Jain Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: तू नेहमीच माझा वापर केला आहेस, अंकिता-विकीच्या नात्यातला दुरावा वाढला, असं का म्हणाली अभिनेत्री?

Ankita Lokhande Big Allegation On Vicky Jain: बिग बॉसच्या घरामध्ये एकमेकांचे चांगले साथीदार होण्याऐवजी ते भांडण करत आहेत. दोघांच्याही नात्यात दुरावा येत चालला आहे.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain:

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा रियालिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये एकत्र एन्ट्री घेतलेल्या अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यामध्ये सतत भांडणं होताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये एकमेकांचे चांगले साथीदार होण्याऐवजी ते भांडण करत आहेत. दोघांच्याही नात्यात दुरावा येत चालला आहे.

नुकताच समोर आलेल्या एका प्रोमो व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी यांच्यात परत कडाक्याचे भांडण झाल्याचे दिसत आहे. अंकिता विकीला स्वार्थी असल्याचे म्हणते. तसंच त्याने सुरूवातीपासूनच माझा वापर केला असल्याचा आरोप ती विकीवर करते. या वादामुळेच आता अंकिता आणि विकी यांच्या नात्यातील अंतर वाढत चालले आहे. सध्या बिग बॉसच्या घरात अंकिता खूपच नाराज आणि डिस्टर्ब असल्याचे दिसून येत आहे.

विकी जैन ब्रेन रूममध्ये शिफ्ट होताच अंकिता लोखंडे खूपच अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. मग अंकिताला बिग बॉसचा आवाज ऐकू येतो. 'तू का काळजी करतेस आणि ज्या व्यक्तीसाठी तू काळजीत आहेस तो खूप आनंदी आहे.' असे ते सांगतात. त्यानंतर विकी अंकिताच्या जवळ येताना दिसतो. त्यानंतर अंकिता त्याला तिच्यापासून दूर ढकलून देते. ती त्याला म्हणते, 'तू खूप स्वार्थी आहेस. तुझ्यासोबत राहून मला खरंच वेड लागलं. आता आपण लग्न केले आहे हे विसरून जाऊ. आजपासून तू वेगळा आहेस, मी वेगळी आहे, तू नेहमीच माझा वापर केला आहेस.’ असं अंकिता विकीला म्हणते.

हे असं पहिल्यांदा झाले नाही. अंकिता आणि विकी यांच्यात बिग बॉसच्या घरात अनेकदा जोरदार वाद झाले आहेत. अंकिता-विकीच्या भांडणावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, 'बिग बॉस त्यांचा घटस्फोट घेतल्यानंतरच सहमत होतील'.

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान देखील विकी आणि अंकिताला यांच्या वागणुकीबद्दल बोलावला आणि सांगितले की अंकिता तू ऐश्वर्या शर्मा भट्टसारखीच आहे. जी अनेकदा शोमध्ये तिचा पती नील भट्ट यांच्याशी वाईट वागताना दिसते. अंकिताने यापूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतबद्दल खुलासा केला होता. सुशांतचा २०२० मध्ये मृत्यू झाला. अंकिताने सुशांत आणि तिच्या अफेअरचे किस्से सांगितले. त्याचसोबत त्यांचा ब्रेकअप कसा झाला याचा देखील उलगडा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT