Mc Stan Debut in Bollywood Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mc Stan Debut :'भाईजान'ने बिगबॉस विनर एमसी स्टॅनला दिली मोठी संधी, 'या' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

Mc Stan : सलमान खानने फर्रे चित्रपटात एमसी स्टॅनला संधी दिल्याचे म्हटले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

MC Stan Debut In Bollywood:

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानची भाची अलिजेह अग्नीहोत्री चर्चेत आहे. 'फर्रे' चित्रपटातून अलिजेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलरमध्ये अलिजेहच्या अभिनयापेक्षा शेवटच्या गाण्याच्या आवाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा आवाज 'बिग बॉस' विजेता एमसी स्टॅनचा असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे एमसी स्टॅन देखील आता चर्चेत आला आहे. सलमान खानने फर्रे चित्रपटात एमसी स्टॅनला संधी दिल्याचे म्हटले जात आहे.

'फर्रे' चित्रपटाची निर्माती सलमान खानने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान या चित्रपटासंबंधीत नवनवीन अपडेट्स आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून देत आहे. या चित्रपटामध्ये सलमानची भाची अलिजेह अग्नीहोत्री ही मुख्य भूमिकेत आहे. (Entertainment News In Marathi)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सलमान खान निर्मित आणि अलिजेहचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे सर्वांना या चित्रपटाची खूपच उत्सुकता लागली आहे. अशामध्ये एमसी स्टॅनने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर या चित्रपटासंबंधित एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे तो देखील या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे बोलले जात आहे.

एमसी स्टॅनने इन्स्टा स्टोरीमध्ये फर्रे चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. त्यावर त्याने असे लिहिले आहे की, 'खतरनाक काम अलीजेह.' यासोबतच त्याने 'सलमान खानच्या चित्रपटासोबत माझा प्लेबॅक डेब्यू.' असं लिहिलं आहे. एमसी स्टॅनच्या या स्टोरीमुळेच त्याची चर्चा होत आहे. आता या पोस्टमुळे एमसी स्टॅन फर्रे चित्रपटातून डेब्यू करणार असल्याचे कळताच त्यांचे फॅन्स खूपच उत्सुक झाले आहेत. ते हा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

सलमान खानच्या 'फर्रे' चित्रपटातून एमसी स्टॅन पार्श्वगायक म्हणून पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. अलिजेह अग्निहोत्रीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत एमसी स्टॅनचे कौतुक केले आहे.

एका रिपोर्टनुसार, ट्रेलरमधील शेवटच्या गाण्यातील आवाज हा एमसी स्टॅनचा असणार आहे. एमसी स्टॅनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, एमसी स्टॅन हा एक रॅपर आहे. त्याचे युट्यूबवर अनेक अल्बम आहेत. त्याचसोबत तो 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी झाला होता. ऐवढंच नाही तर त्याने 'बिग बॉस 16' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. त्यानंतर आता एमसी स्टॅन बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 'फर्रे' चित्रपट 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Shortage : धक्कादायक! जालन्यामध्ये ११० सिलिंडरची चोरी, एजन्सीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी डाव साधला

Long Or Storng Hair Oil: लांब आणि मजबूत केसांसाठी कोणते तेल लावायचे?

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची आज निवड

Namo Shetkari Yojana: राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात ₹२००० जमा होणार; 'नमो शेतकरी'साठी निधी मंजूर

Weight Loss Drinks: पोट साफ आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत हे ७ ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT