Shiv Thakare  Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: 'बिग बॉस'च्या मंडळीतून आणखी एका स्पर्धकाची एक्झिट, आवडत्या स्पर्धकाच्या जाण्याने शिव झाला भावुक

जनतेने टॉप फाईव्ह स्पर्धक निवडले आहेत.

Pooja Dange

Bigg Boss 16 Update: 'बिग बॉस १६' आता अंतिम टप्प्यात आहे. शेवटच्या आठवड्यात सुंबुल तौकीर खान एलिमिनेट झाली आणि घरातील सर्व स्पर्धकांना धक्का बसला. पण शो जसा अंतिम टप्प्यात येतो तसाच तो अजून रंगत जातो.

'बिग बॉस १६' च्या घरामध्ये काल मिड-वीक एलिनीनेशन पार पडलं. तर मिड-वीक एलिमिनेशनमध्ये निमृत कौर अहलूवालिया बिग बॉसच्या घरातुन बाहेर गेली आहे. प्रेक्षकांच्या लिव्ह वोटिंगमुळे निमृतला घराबाहेर जावे लागले आहे. निमृत गेली १८ आठवडे बिग बॉसच्या घरामध्ये तिचे स्थान टिकवून ठेवले होते.

निमृत या शोमधील पहिली आणि शेवटची कॅप्टन ठरली होती. निमृत 'तिकीट टू फिनाले वीक' जिंकण्यात यशस्वी झाली होती.

नुकत्याच झालेल्या भागात प्रेक्षकांना घरामध्ये एन्ट्री देण्यात आली होती. सर्व स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला आणि त्यातूनच टॉप फाईव्ह निवडले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर बिग बॉसने टास्कचे नियम देखील सांगितले.

टास्कमध्ये स्पर्धाकांना प्रेक्षक म्हणजे जनतेकडून मतं मागायची होती. तसेच स्पर्धकांना निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. सर्व स्पर्धकांना त्यांचे मत मांडता भाषण करायचे होते आणि जनतेची मते कमवायची होती.

बिग बॉसने सर्व स्पर्धकांना लिविंग एरियात बोलावले आणि निर्णय सांगितला. जनतेने टॉप फाईव्ह स्पर्धक निवडले आहेत. त्यानंतर बिग बॉसने सहा स्पर्धकांमधून निमृत कौरचे नाव घेतले. तसेच सांगितले की निमृत या स्पर्धकांपैकी घराबाहेर जाणारी स्पर्धक आहे.

बिग बॉसने निमृतचे नाव घेताच शिव ठाकरे भावुक झाला. आता त्याच्या मंडळीमधून आणखी एक स्पर्धक घराबाहेर गेला आहे. आता बिग बॉसच्या घरातील टॉप फाईव्ह स्पर्धक आहेत शिव ठाकरे, एमसी स्टेन, शालिन भानोत, प्रियंका चहर चौधरी आणि अर्चना गौतम.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Paratha: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल पनीर पराठा; नाश्त्याचा बेत होईल भारी

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये अवकाळी पाऊस-गारपिटीचा कहर; 3 एकर पपईची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT