Shiv Thakare  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare: नशीब चमकलं! 'बिग बॉस १६'नंतर शिवने स्वीकारली आणखी एक मोठी ऑफर

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच चाहत्यांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधला. या संवादात त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या घोषणा केल्या.

Chetan Bodke

Shiv Thakare: नुकतंच 'बिग बॉस १६' ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रेक्षकांनी नेहमीच शो ला सर्वाधिक टीआरपी दिला होता. शो प्रमाणे यातील स्पर्धक देखील नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहायचे. त्यातील एक स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिवची अनेकदा विजेता म्हणूनच सर्वत्र चर्चा रहायची. पण त्याला उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं. त्याने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच चाहत्यांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधला. या संवादात त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या घोषणा केल्या.

नेहमीच शिव ठाकरे सोशल मीडियावर सक्रिय असतो. काल त्याने आपल्या चाहत्यांसोबत इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. हा संवाद त्याने यावेळी एका कॅफे मधून साधला. लाईव्हच्या माध्यमातून त्याने आपल्या चाहत्यांना अनेक प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राइजही दिले.

इंस्टाग्राम लाईव्हमध्ये शिवने लवकरच एका मोठ्या चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबद्दल कोणतीही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली नाही. त्याने या लाईव्हमध्ये मोठ्या चित्रपटात शिव ठाकरे एक बड्या स्टारसह झळकणार असल्याची माहिती दिली. यासाठी त्याचे चाहते बरेच उत्सुक आहेत. लवकरच तो याबद्दल अधिकृत माहिती देणार असल्याचंही स्पष्ट केलं. आता नेमका तो स्टार आणि तो चित्रपट कोणता? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

शिव ठाकरे बिग बॉस १६ चा उपविजेता ठरला असून त्याचे विजेता होण्याचे स्वप्न अपुरे राहिले आहे. बिग बॉस १६ चा विजेता सुप्रसिध्द रॅपर MC स्टॅन ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT