Abdu Rozik Book Whole Theater To Watch Pathan Movie Instagram @abdu_rozik
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik Viral Video: 'पठान'ची भुरळ अब्दू रोझिकलाही, संपूर्ण थिएटर बूक करत लुटला चित्रपटाचा आनंद

अब्दुने 'पठान' चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले.

Pooja Dange

Abdu Rozik Book Whole Theater: 'बिग बॉस १६'चा स्पर्धक अब्दू रोजीक सर्वांचाच लाडका आहे. अब्दुने बिग बॉसमधील त्याच्या खेळणे भारतीयांची मने जिंकली आहेत. त्याच्या निरागस स्वभावाने अब्दू लोकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.

'बिग बॉस' संपल्यानंतर अब्दू त्याच्या मंडलीसोबत पार्टी करताना दिसत आहे. अब्दुचे नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अब्दू शाहरुखचा खूप मोठा फॅन आहे हे आपल्याला माहित आहे. बिग बॉसच्या घराबाहेर येताच तो शाहरुख मन्नतबाहेर दिसला होता. हातात शाहरुखचे पोस्टर घेऊन अब्दू शाहरुखला भेटण्यस्तही गेला होता.

अब्दुने पुन्हा एकदा तो शाहरुखचा जबर फॅन आहे हे दाखवून दिले आहे. अब्दुने 'पठान' चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले होते. अब्दुल हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अब्दू कारमधून उतरताच पापाराझींनी त्याला फॉलो करण्यास सुरूवात केली.

अब्दुने पापाराझी, फॅन्स आणि बिग बॉस सदस्यांसोबत चित्रपटाचा आनंद घेतला. त्यांनतर त्याने 'झुमे जो पठान' या गाण्यावर डान्स केला. त्याच आहे व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. अब्दू 'पठान' गाण्यावरील डान्स खूप एन्जॉय करत आहे. तसेच अब्दुने थिएटरमधून सोशल मीडिया लिव्ह देखील केले. अब्दुच्या व्हिडिओमध्ये गोल्डन बॉईज देखील दिसत आहेत.

अब्दुने 'बिग बॉस'चाय घराबाहेर येताच एक गाणे देखील लाँच केले आहे. 'प्यार' असे या आहे. हे गाणे त्याने 'बिग बॉस'च्या फिनालेमध्ये देखील सादर केले होते. प्रेक्षकांना त्याचे गाणे खूप आवडले आहे. 'बिग बॉस'नंतर आता अब्दू यूएसमधील शो 'बिग ब्रदर'मध्ये सहभागी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सीपी राधाकृष्णन भारताचे १७ वे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी पराभूत

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Maharashtra Live News Update: सी.पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

धार्मिकस्थळी नेत मोठ्या भावाकडून ३ वर्षीय बहिणीवर बलात्कार; घटना सीसीटीव्हीत कैद

Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT