Bigg Boss 16 Tina-Shalin Fight Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: 'या' स्पर्धकांवर आली नॉमिनेशनची वेळ तर, शालीन आणि टीनामध्ये 'का रे दुरावा'?

बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्कमुळे वाद. चार स्पर्धकांना घराबाहेर जाण्यासाठी करण्यात आले नॉमिनेट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss 16 Episode Update: 'बिग बॉस'च्या घरात दर आठवड्याला नॉमिनेशनमुळे जवळच्या नात्यांवर सुद्धा अविश्वासाचा ठपका लागत आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की नॉमिनेशन कार्यादरम्यान, एकमेकांकडून अपेक्षा ठेवल्याने स्पर्धकांची फसवणूक होते. अशातच प्रियांका आणि अर्चना यांच्यात कामावरुन बऱ्याचदा भांडण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निमृत आणि अर्चना यांच्यात पिठावरून जोरदार भांडण झाले आहे.

निमृत अर्चनाकडे पीठ मागत होती. ज्यावर अर्चना तिला पीठ देण्यास नकार देते. तिथे असलेले अंकित आणि प्रियंका अर्चनाला निम्रतला पीठ देण्यास सांगतात. अर्चनाने निमृतला पीठ द्यायला हवं, असे अंकितचे म्हणणे होते. पण अर्चनाने एखादी गोष्ट सहज मान्य केली असे होऊच शकत नाही. या दोघींच्या भांडणानंतर बिग बॉस नॉमिनेशन टास्क सुरू करतात. ज्यामध्ये बिग बॉस कुटुंबातील सदस्यांना मेंढ्या आणि लांडग्याचे टास्क देतात. प्रत्येकाला या कार्यातून स्वतःला वाचवण्याची संधी मिळाली होती. (Bigg Boss)

टास्क सुरू होताच प्रियंका म्हणाली की तिचा अर्चनावर विश्वास नाही. एक-एक करून नॉमिनेट झालेले स्पर्धक अर्चन, प्रियांका, अंकित, टीना, शालीन, सौंदर्या आणि गौतम हे खेळण्यास सुरूवात करतात. ज्यामध्ये सौंदर्या पहिली जाते आणि टीनाला नॉमिनेट करते. त्यानंतर शालीन जाऊन गौतमला नॉमिनेट करतो. मग प्रियांका जाऊन शालीनला नॉमिनेट करते. प्रियंका-अंकित आणि अर्चना या टास्कमध्ये नॉमिनेट होण्यापासून वाचतात. (Actors)

टास्कमध्ये जो स्पर्धक नॉमिनेट होत नाहीय तो स्पर्धक वाचतो. म्हणजेच या आठवड्यात टीना, शालीन, सौंदर्या आणि गौतम यांना घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. टास्क संपल्यानंतर टीना आणि शालीनमध्ये जोरदार भांडण होते. टीना शालीनला म्हणते की, 'मला काय करायचे ते सांगू नको.' दोघांमध्ये खूप वाद झाल्याचे दिसून येत आहे. शेवटी दोघेही एकमेकांवर रागावून निघून जातात. (TV)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT