abhijeet bichukale slashes salman khan saam tv
मनोरंजन बातम्या

Abhijeet Bichukale: 'सलमान खान अजून अंड्यात आहे'

बिग बॉसने रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले यांच्यातील दाेघांना बाहेर काढण्याची घोषणा केली हाेती. त्यानूसार त्यांना एका व्यासपीठावर उभे राहण्यास सांगण्यात आले आणि शेवटी देवोलीना आणि अभिजित बिचुकले यांना घरातून बाहेर काढण्यात आल्याचे समोर आले.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : सलमान खान (salman khan) अजून अंड्यात आहे. ताे अजून अंड्याबाहेर यायचं आहे. अभिजीत बिचुकले (abhijeet bichukale) कोण आहे ते त्याला लवकरच कळेल. अरं ताे कोणाशी पंगा घेतोय. मी काय सलमानला दिल्लीतून आलेला गायक वाटलाे ? असा प्रश्न उपस्थित करुन मराठी बिग बाॅस (Bigg Boss) फेम आणि (Bigg Boss 15) अभिजीत बिचुकले (abhijeet bichukale) याने मी छत्रपती शिवरायांच्या राजधानी साताऱ्यातील आहे. नाद करु नका आमचा असे बिचुकलेने बिग बाॅसचे सूत्रसंचालक सलमान खानला (salman khan) सुनावले आहे. (Bigg Boss 15 Finale: Salman khan announces grand finale dates abhijeet bichukale eliminated)

हिंदीतील बिग बाॅस 15 मधून अभिजीत बिचुलकले यास अंतिम फेरीतून वगळण्यात आले आहे. साेमवारी अभिजीत साता-यात (satara) पाेहचला. साता-यात आल्यानंतर त्याने श्री पंचमुखी गणेश मंदिरात येऊन नेहमीप्रमाणे त्याने गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर तेथेच त्याने चाहत्यांना स्वाक्ष-या दिल्या. यावेळी परिचितांसमवेत अभिजीतने गप्पा मारल्या. गप्पा मारताना त्याने अभिजीत बिचुकले काय चीज आहे हे सलमानला अद्याप समजलं नाही. राज्यातील नेत्यांना अभिजीत चांगलाच माहिती आहे अशी टिप्पणी त्याने केली.

दरम्यान बिग बॉस 15 चा सध्याचा सीझन अखेर शेवटाला पोहोचला आहे. शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, राखी सावंत, निशांत भट, रश्मी देसाई आणि प्रतीक सेहजपाल हे सीझनचे सात अंतिम स्पर्धक आहेत. आता शोच्या ताज्या प्रोमोनुसार, होस्ट सलमान खानने फिनालेची तारीख जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं दिली प्रेमाची कबुली, होणारा नवरा आहे तरी कोण? पाहा रोमँटिक PHOTOS

Panchang Today: मंगळवारी मघा नक्षत्र व शोभन योग; आज कोणत्या राशींना मिळणार यश?

Gold Rate Today: खुशखबर! सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update : एकनाथ शिंदेंच्या सभेसाठी कुडाळमध्ये जय्यत तयारी

Mumbai Traffic New Rules: काय सांगता! मुंबईत अवजड वाहनांना बंदी, वाहतुकीचे नवीन नियम काय आहेत?

SCROLL FOR NEXT