Amitabh Bachchan Old Tweet Instagram/ @amitabhbachchan
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Old Tweet: महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत अमिताभ बच्चन यांनी १३ वर्षांपूर्वी केलेलं ट्विट पुन्हा का होतंय व्हायरल, नेटकरी चिडले

Amitabh Bachchan Old Tweet Viral: सध्या बिग बींचं १३ वर्ष जुनं ट्वीट सोशल मीडियावर कमालीचं व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Amitabh Bachchan Goes Viral From Old Tweet: बिग बी अमिताभ बच्चन कायमच विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. बिग बींनी आपल्या वयाची ऐंशी पार केली असली तरी, एकापेक्षा एक उत्तम चित्रपटांतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

अमिताभ ट्विटरसह अनेक सोशल मिडीया अकाऊंट्सवर देखील कायमच सक्रिय राहतात. सध्या बिग बी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचं १३ जुनं ट्वीट सध्या सोशल मीडियावर कमालीचं व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी महिलांच्या अंतर्वस्त्राबाबत भाष्य केलंय. यावरून त्यांना नेटकरी सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी २०१० साली महिलांच्या अंतर्वस्त्राबाबत एक ट्वीट केलं होतं. “इंग्रजीमध्ये ब्रा एकवचनी आणि पॅन्टीज अनेकवचनी, असं का?” असं आशय असलेलं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी १२ जून २०१० रोजी केलं होतं. सध्या त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या जुन्या ट्विटमुळे अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेच ट्रोल होत आहेत.

बिग बींच्या या ट्विटवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे, एका युजरने कमेंट केली की, ‘आफ्टर ऑल कोणीतरी महत्त्वाचे प्रश्न विचारत आहे.’ तर आणखी एक युजर म्हणतो, ‘चांगला प्रश्न आहे सर, केबीसीच्या नेक्स्ट सीझनमध्ये तुम्ही हा प्रश्न विचारा.’ (Bollywood Actor)

तर आणखी एकाने बिग बींच्या ट्वीटवर कमेंट केली की, ‘हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हते.’ अशाप्रकारे अमिताभ बच्चन यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागला. व्हायरल होणाऱ्या ट्वीटवर बच्चन यांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे तर, काहींनी त्यांना ट्रोल केलंय.

बिग बींच्या चाहत्यांचे म्हणणे आहे, की, हा प्रश्न इंग्रजी व्याकरणाचा आहे, त्यांनी उदाहरण जरी असं दिलं असलं, तरीही हा प्रश्न योग्य आहे.

बिग बींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अमिताभ बच्चन लवकरच ‘कौन बनेगा करोडपतीच्या १५’ व्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पहिल्या सीझनपासून बिग बी या शोचे होस्टिंग करत आहेत.

‘कौन बनेगा करोडपतीच्या १५’ व्या सिझनचे देखील बिग बीच होस्टिंग करणार आहेत. याबद्दलची माहिती बिग बींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. सोबतच सेटवरील देखील फोटो त्यांनी शेअर केला होता.

याशिवाय बिग बी चित्रपट प्रोजेक्ट के देखील तयारी करत आहेत. त्या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रभास, दीपिका पादुकोण आणि कमल हसन देखील दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT