Amitabh Bachchan Old Tweet Instagram/ @amitabhbachchan
मनोरंजन बातम्या

Bigg B Bachchan 81th Birthday: यंदाचा बिग बींचा वाढदिवस होणार स्पेशल, महानायकाच्या फॅन्सला मिळणार ‘या’ खास वस्तू; जाणून घ्या एका क्लिकवर

Chetan Bodke

Amitabh Bachchan 81st Birthday Memorabilia Auctioned

महानायक अमिताभ बच्चन आजही आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाकरिता चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. येत्या ११ ऑक्टोबर रोजी बिग बींचा ८१ वा वाढदिवस आहे. अमिताभ यांचा हा वाढदिवस खास सेलिब्रेट होणार आहे. त्यांच्या अनेक खास वस्तुंचा येत्या ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत लिलाव करण्यात येणार आहे.

हा लिलाव एका कंपनीतर्फे ठेवण्यात आला आहे. Rivas & Ives या कंपनीकडून या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. बॉलिवूडचा ‘शहनशाह’ म्हणून सर्वश्रुत असलेल्या अमिताभ यांचा यंदाचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला जाणार आहे. बिग बींच्या अनेक वस्तुंचा लिलाव त्यांच्या खास चाहत्यांसाठी होणार आहे. Rivas & Ives या कंपनीकडून या लिलावाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनी ‘बच्चनेलिया’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिग बींच्या सिनेकरियरचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी नव्या पिढीला आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांची सिनेकारकिर्द पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. या लिलावामध्ये बिग बींच्या काही चित्रपटांचे पोस्टर, फोटो, लॉबी कार्ड, शोकार्ड, फिल्म बुकलेट आणि ओरिजनल आर्टवर्क या वस्तुंचा लिलाव करण्यात येणार आहे.

यावेळी लिलावात जंजीर, दीवार, फरार, शोले यांसारख्या चित्रपटांतील काही आठवणी चाहत्यांना पाहता येणार आहे. त्यासोबतच ‘शोले’ प्रदर्शित झाल्यानंतर रमेश सिप्पी यांनी आयोजित केलेल्या पार्टीतील काही फोटो, ‘मजबूर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘द ग्रेट गॅम्बलर’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटातील काही दुर्मिळ पोस्टर्स, प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी बिग बींचे शुट केलेले काही दुर्मिळ पोट्रेट ही यावेळी लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान बिग बींच्या कामाबद्दल सांगायचे तर, ते कायमच सोशल मीडियावर आपल्या ब्लॉग्सच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्कात असतात. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती १५’च्या माध्यमातून आपल्या भेटीला येत असतात. ते पहिल्या सीझनपासून या शोची होस्टिंग करीत आले आहेत. त्यासोबतच बिग बी ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘गणपत’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. त्यातून त्यांचा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला, हा लूक नेटकऱ्यांना फारच भावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

Ajit Pawar : अजितदादा विधानसभेत वापरणार मुस्लिम कार्ड !

Manoj Jarange Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील शुगर कमी, चालताही येईना

SCROLL FOR NEXT