Shiv Thakare News saam tv news
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare: 'हे' माझ्यासमोर असलेलं सर्वात मोठं चॅलेंज.. बिग बॉस विजेता पहिल्यांदाच झाला व्यक्त

Shiv Thakare News: शिव ठाकरेने आपल्यासमोर असलेल्या चॅलेंजबाबत वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Shiv Thakare:

'बिग बॉस सीझन 16' आणि 'खतरों के खिलाडी सीझन 13' या रिअॅलिटी शोनंतर मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे लवकरच 'झलक दिखला जा 11' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये डान्सच्या माध्यमातून जलवा दाखवणार आहे. शिवचे चाहते त्याचा डान्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकताच त्याने दिलेल्या मुलाखतीत आपल्या फिटनेसबाबत खुलासा केला आहे.

जिम बॉडी असलेली मुलं डान्समध्ये चांगली नसतात असा सर्वसाधारण समज आहे. याबाबत शिव ठाकरेला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना शिवने सांगितले की, "मी आधी डान्सर होतो त्यामुळे मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत नाही. पण हो सध्या मला डान्समध्ये सनी देओल सारखं वाटत आहे. जिममध्ये जास्त वजन उचलल्यामुळे माझी लवचिकता कमी झाली आहे. जेव्हा मी जिमला जाण्यास सुरुवात केली, तेव्हा मला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते. वर्कआउट करण्यापूर्वी तुम्हाला लवचिकतेसाठी वॉर्मअप एक्सरसाइज करावा लागतो हे सांगायला कोणीच नव्हतं ."

बिग बॉस सीझन 16 आणि खतरों के खिलाडी सीझन 13 नंतर, झलक दिखला जा सीझन 11 हा शिव ठाकरेचा वर्षांतील तिसरा रिअ‍ॅलिटी शो असणार आहे. जो त्याला खऱ्याअर्थाने किंग ऑफ रिअ‍ॅलिटी बनवणार आहे.

'झलक दिखला जा'च्या प्रवासाबद्दलच्या अपेक्षांबद्दल माहिती देताना शिव ठाकरेने सांगितलं की, "माझा झलक दिखला जाचा हा प्रवास फक्त ट्रॉफी जिंकण्याचा आणि सहभागी होण्याचा प्रवास नाही तर डान्समध्ये सनी देओलकडून टायगर श्रॉफ किंवा ऋतिक रोशन बनण्याचा प्रवास आहे. लवचिकता मिळवणे, डान्सचे विविध प्रकार शिकणे आणि तेथील सामान्य माणसांचे खूप प्रेम मिळवणे आणि माझी कोरिओग्राफर रोमशा सिंग या सर्वांसाठी मला मदत करत आहे."

मिस्टर अनस्टॉपेबल, शिव ठाकरेने झलक दिखला जा या शोची शूटिंग आधीच सुरू केली आहे. कारण हा कार्यक्रम यंदाच्या दिवाळीत प्रसारित होणार असताना त्याला पडद्यावर नाचताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड भेट ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT