shehnaaz gill instagram
मनोरंजन बातम्या

चर्चा तर होणारच! बिग बॉस फेम शहनाज गिल पुन्हा प्रेमात

शहनाजचे कोणतेही फोटो, व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. मात्र सध्या तिच्या फोटोची नाही, तर वेगळीच चर्चा रंगली आहे. शहनाज गिल प्रेमात असल्याचं बोललं जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बिग बॅासमधून (Big Boss) प्रेक्षकांची मनं जिकलेली अभिनेत्री शहनाज गिल कोणत्या ना कोणत्या विषयामुळे नेहमी चर्चेत असते. शहनाज तिच्या खासगी आणि प्रोफेशनल लाइफमुळं प्रकाशझोतात असते. सोशल मीडियावर शहनाज कायम सक्रिय असते. शहनाजचे कोणतेही फोटो, व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. मात्र सध्या तिच्या फोटोची नाही, तर वेगळीच चर्चा रंगली आहे. शहनाज गिल प्रेमात असल्याचं बोललं जात आहे.

'बिग बॅास १३'मधील तिच्या एन्ट्रीनंतर शहनाज गिल खऱ्या अर्थानं प्रसिध्दीझोतात आली. सध्या शहनाज तिच्या हॅाट आणि बोल्ड लूकमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'पंजाबची कॅटरिना कैफ' शहनाज गिल आता लवकरच 'भाईजान' सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटातून बॅालिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दुसरीकडे प्रसिद्ध डान्सर राघव जुयाल देखील बॅालिवूडमधील आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहे. दोघेही सलमान खानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. याचदरम्यान शहनाज गिल प्रेमात पडली असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शहनाज आणि राघव जुयाल याच्यांत मैत्रीच्या पलीकडेही 'चोरी-चोरी, चुपके-चुपके' चाललंय, अशी कुजबुज सुरू आहे.

राघव जुयाल हा लोकप्रिय कोरिओग्राफर, डान्सर अभिनेता आणि टिव्ही होस्ट आहे. चित्रपटात त्याला स्पेशल डान्स परफॅार्मन्ससाठी नाही, तर एका भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले. शहनाज गिल आणि राघव जुयाल दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही या दोघांनी अधिकृतपणे त्याच्या नात्याबद्दलचा खुलासा केला नाही.

शहनाज गिलला पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून ओळखतात. बिग बॅास १३ मधून शहनाजला प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख मिळाली. शोमधील शहनाज आणि सिध्दार्थ शुक्लाची मैत्री सर्वांनाच माहीत आहे. मैत्रीनंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. याचदरम्यान शहनाज गिल आणि सिध्दार्थ शुक्लाच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चाहत्यांना दोघांची केमिस्ट्री इतकी आवडली आणि त्यांनी दोघांना 'सिदनाज' असे नाव देखील दिले. मात्र सिध्दार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज एकटी पडली होती. काही महिन्यानंतर तिने स्वत:ला सावरले आणि आता ती आंनदी असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

SCROLL FOR NEXT