मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Update : जद हदीदचा नवा फंडा; या ट्रिकने आकांक्षा - मनीषाला अडकवतोय प्रेमाच्या जाळ्यात

Jad Hadid Goes Shirtless :

Pooja Dange

Jad Hadid Impress Manisha Rani : सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे. बिग बॉस ओटीटी २ ची दमदार ओपनिंग झाली आहे. गेम प्लॅनिंग, प्रेम, भांडण आणि मैत्री यांच्यातील बदलते नाते बिग बॉसच्या घरातील कथा बनतात.

शुक्रवार, 23 जून 2023 रोजीच्या 7 व्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे अनेक रंग दिसले. बेबीका ध्रुवे आणि अभिषेक मल्हान यांच्यात वाद होत असतानाच दुसरीकडे जद हदीदने घरात उपस्थित असलेल्या मुलींना गोड बोलून भुरळ पडली आहे. (Latest Entertainment News)

शोमध्ये आलेला लेबनीज मॉडेल जद हदीदने आधीच मुलींच्या मनात घर केले आहे. जद हदीदने जेव्हा तिचा टी-शर्ट काढून त्याची बॉडी दाखवली तेव्हा बिग बॉसच्या घरातील मुलींच्या हृदयाची धडधड वाढली. हदीदनेही घरातील मुलींना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडली नाही. शर्टलेस होत जदने घरातील कामे केली आणि आकांक्षाला त्याच्या मनाची गोष्ट सांगितली.

जद हदीद बिग बॉसच्या घरातील आणि बाहेरही मुलींना त्याच्या लूकने आणि बॉडीने इम्प्रेस करत आहे. आकांक्षावरील प्रेम व्यक्त करताना जद म्हणाला की, तू घरात नसतीस तर मी इथे कसे राहिलो असतो. इथल्या भांडणात मला तू पाहून शांत वाटतं.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनीषा राणीला जद हदीदला तिचा चाहता बनवायचा आहे. मनीषा हॉट असल्याचे सांगताना हदीद म्हणाला की, घराबाहेर तुझे आशिक वेडे झाले असतील. यावर राणी म्हणाली की मला तुला वेडे करायचे आहे.

बिग बॉसने बेबीकाला तुरुंगातून बाहेर येण्यासाठी एक टास्क दिला, ज्यामध्ये तिला अभिषेक आणि मनीषाचे फेस रीडिंग करावे लागले होते, परंतु बेबीकाने अभिषेकबद्दल जे सांगितले ते ऐकून अभिषेक संतापला. दोघांमध्ये खूप वाद झाले.

बिग बॉसच्या घरातील हा पहिला आठवडा आहे. बिग बॉसच्या हे काही घडत आहे ती तर सुरुवात आहे. वीकेंडला सलमान खान कोणाची शाळा घेणार याची कुटुंबीयांसह चाहतेही वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT