Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: सदस्यांचा मान ठेव, अन्यथा तुलाही तुरुंगात टाकू; रितेश निक्कीवर का संतापला?

Bigg Boss Marathi 5 Update: बिग बॉस मराठीच्या घरात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जान्हवीनंतर तुरुंगात जाण्यासाठी आता निक्कीचा नंबर लागणार का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या ५व्या सिझनला सुरुवात आली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या भागापासूनच घरामध्ये राडे आणि कल्ला पाहायला मिळतोय. मागिल आठवड्यात अरबाजने त्याची कॅप्टनसी निक्कीला बर्थ डे गिफ्ट म्हणून दिली होती. मागच्या आठवड्यामध्ये निक्की आणि आणि जान्हवीने पॅडी (पंढरीनाथ कांबळे) आणि वर्षा उसगावकर यांच्या बद्दल वैयक्तिक भाष्य केलं होतं ज्यामुळे सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी जान्हवी आणि निक्कीला ट्रोल केलं आहे.

मागील आठवड्यामध्ये निक्कीने वर्षा उसगावकर यांच्या बद्दल वैयक्तिक वकतव्य केलं होतं ज्यामुळे अनेक चाहात्यांमध्ये संताप निर्माण झाला होता. तर जान्हवी आणि निक्कीने पॅडीचा अपमान करत त्यांला "तू जोकर आहेस" असं म्हटलं होतं. निक्की आणि जान्हवी यांच्या अशा वागनुकीमुळे अनेक प्रेक्षकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. त्यासोबतच अनेक कलाकारांनी पॅडी आणि वर्षा यांच्या समर्थनात सोशल मीडिया द्वारे पोस्ट केले आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर पॅडी आणि वर्षा ताईंच्या अनुभवाचा आणि त्यांच्या कामाचा मान ठेवा असं निक्की आणि जान्हवीला खडसवून सांगितलं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज एक नवा द्विस्ट पाहायला मिळतो. भाऊच्या धक्काच्या भागामध्ये जान्हवी किल्लेकरला बिग बॉसकडून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. या नव्या ट्विस्टमुळे घरातील सदस्यांमध्ये खळब उडालेली असतानाच आता निक्कीला सुद्धा तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. बिग बॉस मराठी सिझन ५ चा होस्ट रितेश देशमुख यांनी निक्कीला थेट तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. पॅडी आणि वर्षा यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे जान्हवीला सुद्धा तुरुंगात टाकणार की काय अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनने कलर्स मराठीवरील सर्व मालिकांना TRP च्या तुमनेत मागे टाकलं आहे. बिग बॉस मराठी सिझन ५च्या सुत्र संचालनाचा विडा रितेश देशमुखने उचल्ला आहे. रितेशच्या लय भारी स्टाईलला अनेक प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. कालच्या भागामध्ये इरिना रुडाकोवाने घरच्यांना रामराम केलं आता घरातील सदस्यांमधील अनेक राडे अजून बाकी आहे. येणाऱ्या अठवड्यांमध्ये आपल्याला अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. रितेश देशमुखे आणि बिग बॉस खरचं निक्कीला तुरुंगात टाकणार का? हे पाहाणं रंजक ठरणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT