Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: निक्कीला पडली कॅप्टनसी भारी; अभिजीतला म्हणाली...

Bigg Boss Marathi New Season Day 32 : निक्की पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरावर राज्य करताना दिसून येत आहे. पण आता हीच कॅप्टनसी निक्कीला चांगलीच महागात पडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'बिग बॉस मराठी'चा पाचवा आठवडा सुरू असून या आठवड्याची कॅप्टन डोंबिवलीकर निक्की तांबोळी आहे. निक्की पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस मराठी'च्या घरावर राज्य करताना दिसून येत आहे. अरबाजने निक्कीला वाढदिवसाची भेट म्हणून कॅप्टनसी दिली आहे. पण आता हीच कॅप्टनसी निक्कीला चांगलीच महागात पडली आहे.

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात निक्की आणि अभिजीत एकमेकांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. अभिजीत निक्कीला म्हणतोय,"तू एकदम वाईट वागली आहेस..ज्याप्रकारे तू त्याला दुखावलं आहेस, अशी एक खोटी स्टोरी त्यांनी बनवली आहे". यावर निक्की म्हणते,"त्या स्टोरीमध्ये मी विलन ठरली आहे आणि तो हिरो ठरला आहे.

पुरुषाचा राग कंट्रोल करण्याची पॉवर एका महिलेकडे आहे. पण त्याला आता असं वाटतंय की माझ्याकडे सगळं आहे आणि हिला आता दूर करा. 100 माणसांपेक्षा एक महिला सामर्थ्यवान आहे. पण त्याला हे 100 माणसं हवी आहेत. कॅप्टनसी मला खूप भारी पडली आहे. नॉमिनेटदेखील झाले आहे". त्यावर अभिजीत म्हणतो,"तुझ्यासोबत मलादेखील ही कॅप्टनसी भारी पडली आहे".

दुसरीकडे अरबाज, डीपी दादा, अंकिता, आर्या, वर्षा ताई, सूरज, घन:श्याम ही मंडळी निक्कीबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. अरबाज म्हणतोय,"मी तिच्यासाठी खूप गोष्टी केल्या. त्यामुळे माझी चांगली इमेज वाईट कशी दिसेल यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. पण मी मात्र लोकांसमोर तिला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे". यावर अरबाजला डीपी दादा म्हणतो,"वैभव, अरबाज आणि जान्हवी हे आता आपल्याला जवळ करणार नाहीत हे निक्कीला कळालं आहे. त्यामुळे माझ्या विचारसरणीनुसार तिचा प्लॅन हाच असेल की, मी आता हे कसं सिद्ध करू की मी किती प्रयत्न करत आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT