Bhool Chuk Maaf  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhool Chuk Maaf Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'भूल चूक माफ'चा जलवा कायम; 'केसरी वीर'ला मोठा झटका

Bhool Chuk Maaf Box Office Collection Day 9: राजकुमार रावच्या 'भूल चुक माफ' चित्रपटासोबतच अभिनेता सुनील शेट्टी यांचा 'केसरी वीर' हा चित्रपटही चित्रपटगृहात दाखल झाला आहे. तरीही, 'भूल चुक माफ' दररोज उत्तम कलेक्शन करत आहे.

Shruti Vilas Kadam

Bhool Chuk Maaf Box Office Collection: राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भूल चूक माफ' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. २३ मे २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टाइम-लूप रोमँटिक ड्रामाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, 'भूल चुक माफ'ने ९व्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५.१५ कोटी कमाई केली. अशाप्रकारे, आता त्याचे एकूण कलेक्शन ५२.५० कोटी झाले आहे. येत्या काळात हा चित्रपट आणखी उत्तम कलेक्शन करेल अशी अपेक्षा आहे.

चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यातील कमाई खालीलप्रमाणे आहे:

दिवस १: ७ कोटी

दिवस २: ९.५ कोटी

दिवस ३: ११.५ कोटी

दिवस ४: ४.५ कोटी

दिवस ५: ४.७५ कोटी

दिवस ६: ३.५ कोटी

दिवस ७: ३.३५ कोटी

दिवस ८: ३.२५ कोटी

दिवस ९: ५.१५ कोटी

या चित्रपटाने राजकुमार रावच्या कारकिर्दीतील तिसऱ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान मिळवला आहे. चित्रपटाच्या यशामागे त्याची नवीन कथा, कलाकारांची उत्कृष्ट अभिनयशैली हे घटक महत्त्वाचे ठरले आहेत. 'भूल चूक माफ' ची ही यशोगाथा आगामी दिवसांतही कायम राहण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: महत्वाची बातमी! PF काढण्याचे नियम बदलले, हा फॉर्म भरला नाही तर पैसे अडकणार?

Maharashtra News Live Update : खासदार सुप्रिया सुळेंना बसला वाहतूक कोंडीचा फटका

Press Freedom Index : प्रेस स्वातंत्र्यात 180 देशांमध्ये भारत १५७ व्या क्रमांकावर, 6 अंकांनी घसरला

पालघर हादरले! एकाच ठिकाणी २ तरूणांचे आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात, नेमकं झालं काय?

HSC Result 2026: बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहायचा? या एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT