Bhool Bhulaiyaa 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bhool Bhulaiyaa 3' चा सर्वात महागडा कलाकार कोण? 'धक धक गर्ल'चं मानधन किती?

Bhool Bhulaiyaa 3 Cast Fees: हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया ३' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. चला तर मग कोणाला सर्वाधिक मानधन मिळालं जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आता 'स्त्री २' नंतर 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiyaa 3) हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'भूल भुलैया ३' हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 'भूल भुलैया ३'मध्ये कार्तिक आर्यन (kartik aaryan) , विद्या बालन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित हे सेलिब्रिटी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू करणार आहेत. 'भूल भुलैया ३' हा चित्रपट अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,'भूल भुलैया ३'जवळपास 150 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. तर मग या चित्रपटातील तगड्या सेलिब्रिटींना किती मानधन मिळाले जाणून घेऊयात.

कोणाला किती मानधन?

मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यने रूह बाबासाठी 48-50 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. मंजुलिकाच्या भूमिकेसाठी विद्या बालनने (Vidya Balan) 8 ते 10 कोटी रुपये फी घेतली आहे.'भूल भुलैया ३' मध्ये दुसरी मंजुलिका म्हणजे 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) तिच्या भूमिकेसाठी 5 ते 8 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. या चित्रपटात कार्तिकच्या प्रेमात असणाऱ्या तृप्तीला मात्र सर्वात कमी मानधन मिळाले आहे. तृप्ती डिमरीला 80 लाख रुपये मानधन मिळालं आहे.

'भूल भुलैया 3' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'भूल भुलैया ३' चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1 नोव्हेंबरला 'भूल भुलैया 3' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT