Singer Nisha Upadhyay Injury Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Nisha Upadhyay Injury: लाईव्ह शो दरम्यान गोळीबार, प्रसिद्ध भोजपूरी गायिका जखमी...

Singer Nisha Upadhyay News: लाइव्ह शो दरम्यान भोजपुरी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायिका निशा उपाध्यायवर कुणीतरी गोळी झाडली.

Chetan Bodke

Bhojpuri Singer Nisha Upadhyay Suffers Bullet Injury: भोजपुरी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायिका निशा उपाध्यायची लोकप्रिय गायिका म्हणून सर्वत्र ओळख आहे. तिच्या आवाजाची जादू अनेक लोकांवर आहे. तिच्या लाइव्ह परफॉर्मन्समध्ये प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. पण आता तिच्याविषयी एक बातमी समोर येतेय, छपरा मध्ये एका लाइव्ह शो दरम्यान तिच्यावर कुणीतरी गोळी झाडली.

निशावर मंगळवारी छपरा येथे स्टेज शोदरम्यान हवेत गोळीबार करण्यात आला होता. त्या दरम्यान तिच्या पायाला गोळी लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सध्या गायिकेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. गाणे सादर करण्यासाठी आलेल्या निशाला पाहून तिच्या चाहत्यांनी आनंदाच्या भरात हवेमध्ये गोळीबार केला. या घटनेनंतर गायिकेला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना घडली कशी आणि यात कोण कोण सामिल आहेत, सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. (Bollywood Actress)

निशा उपाध्याय सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर नेहमीच गायिका आपल्या स्टेज परफॉर्मन्सचे व्हिडीओ शेअर करते. त्यातून तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली असून चाहते तिच्या व्हिडीओंवर तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. तिचे गाणे युट्यूबवर देखील बरेच प्रसिद्ध आहेत. गायिकेचा सोशल मीडियावर १ कोटी इतका तगडा चाहतावर्ग आहे. निशाचं स्वतःचं युट्युब चॅनल असून त्यावर ती तिच्या गाण्यांचे व्हिडीओज अपलोड करत असते. (Bollywood Film)

निशा उपाध्याय हा भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध चेहरा असून तिने आपल्या सुमधूर आवाजानं चाहत्यांमध्ये आपली खास ओळख बनवली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT