Akanksha Dubey end  Instagram @akankshadubey_official
मनोरंजन बातम्या

Bhojpuri Actress Akanksha Dubey: सिनेसृष्टीवर शोककळा, वयाच्या २५व्या वर्षी अभिनेत्री आकांक्षाने संपवले जीवन

Bhojpuri Actress: आकांक्षा दुबेने बनारस येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे.

Saam Tv

Akanksha Dubey End Her Life: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने बनारस येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. सारनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सौमेंद्र हॉटेल मध्ये तिने फास लावून स्वतःचे जीवन संपवल्याचे सांगण्यात येत आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील ती एक नावाजलेले व्यक्तिमत्व होते.

आकांक्षाने 'वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करनेवाले की २'मध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजलेले नाही. बनारस येथे आकांक्षा चित्रपटाच्या शूटिंगसाठी केली होती.

रविवारी आकांक्षा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. शनिवारी रात्री आकांक्षाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. भोजपुरी इंडस्ट्रीसाठी ही एक दुःखद बातमी आहे. तिच्या जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे.

आकांक्षा दुबेने व्हायच्या १७व्य वर्षांपासूनच भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. दिग्दर्शक आशी तिवारी यांच्या काही चित्रपटांमध्ये तिने काम केले. तिला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. २०१८मध्ये आकांक्षा डिप्रेशनमध्ये गेली. त्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. इंडस्ट्रीत नवीन कलाकाराला देण्यात आलेल्या वागणुकीमुळे ती खचली होती.

या कठीण काळी तिच्या आईने तिला साथ दिली. त्यामुळे तिने पुन्हा काम करण्यास सुरूवात केली. चित्रपटांव्यतिरिक्त तिने अनेक म्युजिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे. २०२१ साली आलेले आकांक्षाचे गाणे 'तुम जवान हम लाइका' ब्लॉकब्लस्टर झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT