Sri Ganeshan Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sri Ganeshan Passed Away: भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन, नृत्य सादर करतानाच झाली देवाज्ञा...

Sri Ganeshan: मलेशियन भरतनाट्यम वादक ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Guru Sri Ganesan Passed Away: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी येत आहे, ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे शुक्रवारी (९ जून) मलेशियन भरतनाट्यम वादक ज्येष्ठ भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ भारतनाट्यम गुरू स्टेजवर आपली कला सादर करत असताना त्यांना देवाज्ञा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, श्री गणेशन स्टेजवर असताना ते अचानक खाली कोसळले, लगेचच त्यांना तेथील उपस्थितांनी रूग्णालयात देखील दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. श्री गणेशन यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठण्यात आले.  

श्री गणेशन हे भुवनेश्वरमधील भांजा कला मंडपातील देवदासी नृत्याच्या कार्यक्रमाला ३ दिवसासाठी गेले होते. शुक्रवार या कार्यक्रमाच्या शेवटचा दिवस होता. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती उत्तम होती. सादरीकरण करेपर्यंत त्यांची प्रकृती अगदी उत्तम होती. (Tollywood)

सादरीकरण करत असताना एका क्षणाला मंच प्रकाशमान झाला आणि ते अचानक कोसळले. लगेचच त्यांना उपस्थित असलेल्या व्यक्तींनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, पण त्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. (Bollywood)

भरतनाट्यम प्रवर्तक श्री गणेशन हे मलेशियाचे नागरिक होते आणि ते मलेशिया भरतनाट्यम नृत्य संघटनेचे अध्यक्ष तसेच क्वालालंपूर येथील श्री गणेशालयाचे संचालक होते. कॅपिटल रूग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री गणेशन यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT