Bengali director Tarun Majumdar passes away Saam TV
मनोरंजन बातम्या

'बालिका वधू' या सुप्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शक तरुण मजूमदार काळाच्या पडद्याआड

तरुण मजूमदार हे मागील अनेक दिवसांपासून किडनी संबंधित आजाराने त्रस्त होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. 'बालिका वधू' (Balika Vadhu) या सुप्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शक तरुण मजूमदार (Tarun Majumdar) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. मजूमदार यांचे निधन झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. मजूमदार यांच्या निधनांचे वृत्त समजताच अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मजूमदार हे मागील अनेक दिवसांपासून किडनी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावरती कोलकातामधील (Kolkata) सेठ सुखल करनानी मैमोरिय़ल रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. ३ जुलै रोजी मजूमदार यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीमध्ये काही सुधारणा न झाल्याने अखेर ४ जुलै सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, मजूमदार हे बांग्ला चित्रपट सृष्टीचे (Bangla Film Industry) प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट सिनेसृष्टीला दिले. मजुमदार यांचा १९६७ मध्ये आलेल्या 'बालिका वधू' हा चित्रपट सुपरहिट झाला होता. याशिवाय त्यांनी कुहेली, श्रीमान पृथ्वीराज, फुलेश्वरी यांसारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

तसंच मजुमदार यांना ४ राष्ट्रीय पुरस्कार, ७ बीएफजेए, ५ फिल्मफेअर पुरस्कार आणि एक आनंदलोक पुरस्कार मिळाले शिवाय १९९० मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं होतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT