Batatyachi Chaal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Batatyachi Chaal: पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात; २१ कलाकार रंगभूमीवर सादर करणार भव्य संगीतप्रयोग

Batatyachi Chaal Musical: पु. ल. देशपांडेंच्या 'बटाट्याची चाळ'वर आधारित 'या इथे चाळ बटाट्याची' ही दोन अंकी संगीतिका लवकरच रंगमंचावर येणार आहे. या संगीतिकामध्ये २१ कलाकारांचा भव्य सहभाग असणार आहे.

Shruti Vilas Kadam

Batatyachi Chaal Musical: मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या अजरामर 'बटाट्याची चाळ' या साहित्यकृतीला आता नव्या संगीतिकेच्या रूपात रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. 'या इथे चाळ बटाट्याची' या दोन अंकी भव्य मराठी संगीतिकेच्या माध्यमातून पु. ल. देशपांडे यांच्या 'एक संगीतक' या संकल्पनेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संगीतिकेत तब्बल २१ कलाकारांचा सहभाग असून गद्य संवादाशिवाय गीत, संगीत आणि अभिनयाच्या माध्यमातून चाळीचे विश्व उभे केले जाणार आहे.

पु. ल. देशपांडे यांनी आपल्या लेखणीतून चाळसंस्कृतीतील माणुसकी, विनोद, संघर्ष, नातेसंबंधातील ऊब आणि सामान्य माणसांचे भावविश्व अत्यंत जिवंतपणे मांडले. त्या साहित्याचा आत्मा कायम ठेवत आधुनिक रंगभाषेचा वापर करून ही संगीतिका साकारण्यात आली आहे. संवादाऐवजी संगीत, गायन, रंगमंचीय हालचाली आणि बहुपात्री सादरीकरणातून चाळीतील जीवनाचा रंजक आणि हृदयस्पर्शी अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

या संगीतिकेचे मूळ लेखन आणि संगीत पु. ल. देशपांडे यांचे असून, कार्यक्रमाची निर्मिती कपीश जोशी यांनी केली आहे. देवेंद्र भोमे आणि योगेश सप्रे यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून संगीत दिग्दर्शन देवेंद्र भोमे यांचे आहे. तर नाट्यरूपांतराची जबाबदारी योगेश सप्रे यांनी पार पाडली आहे.

या संगीतिकेत पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शमिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे आणि साक्षी देशपांडे यांच्यासह अनेक कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. याशिवाय मंदार बगाडे, ओमकार जोशी, सई जोशी, सिद्धी देशपांडे, तनिष्का जोशी, दीप वैद्य, स्वप्नील कुंभार आणि केदार जाधव हे वाद्यवृंद कलाकारही संगीतिकेला सुरेल साथ देणार आहेत.

नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली असून प्रकाशयोजना सुजय भडकमकर यांची आहे. वेशभूषा गायत्री चक्रदेव, नृत्यरचना मधुरा आफळे, निर्मिती सूत्रधार नितीन नाईक आणि पराग पब्लिसिटीचे काम मयूर वैद्य पाहत आहेत. पारंपरिक मराठी संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा आणि आधुनिक सादरीकरणाचा सुरेख संगम या संगीतिकेत अनुभवायला मिळणार आहे. पुलंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांसह नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही हा आगळावेगळा संगीतप्रयोग निश्चितच भावेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health Tips: पावसाळ्यात हे 4 ज्यूस वाढवतील तुमची रोगप्रतिकारक शक्ती!

आंदोलन फसलं! आमदारासह महापौर अन् भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Crime: औरंगाबादमध्ये नेपाळी महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या हातात २०० रुपये ठेवत आरोपींनी काढला पळ

Mumbai Fort : ब्रिटिशांनी उभारलेला मुंबईतील 'हा' ऐतिहासिक किल्ला आहे खूपच खास, तुम्ही कधी पाहिलात का?

Maharashtra News Live Update: पुण्यातील डेक्कन चौकात सर्वपक्षीय आंदोलन

SCROLL FOR NEXT