Dream Girl 2 Box Office Collection Instagram
मनोरंजन बातम्या

Dream Girl 2 Collection: 'गदर 2'ला मागे टाकत 'ड्रीम गर्ल 2'ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई

Dream Girl 2 Box Office Collection Day 2: 'ड्रीम गर्ल २'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Pooja Dange

Ananya Pandey Movie Dream Girl 2 Collection:

आयुष्यमान खुराना आणि अनन्या पांडे या जोडीचा पहिला चित्रपट 'ड्रीम गर्ल २' शुक्रवारी म्हणजे २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. 'ड्रीम गर्ल २'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटातील 'ड्रीम गर्ल' प्रेक्षकनाची मने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. दोन दिवसात या चित्रपटाने २५ कोटींचे कलेक्शन केले आहे. वीकेंडला चित्रपट दमदार कमाई करेल अशी सर्वांची अपेक्षा आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी 'ड्रीम गर्ल २' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहे. चित्रपटाने काल म्हणजे शनिवारी १४.०२ कोटींचे कलेक्शन केले आहे. तर शुक्रवारी चित्रपटाने १०.६९ कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाने दोन दिवसात २४.७१ कोटींचे एकूण कलेक्शन केले आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'गदर २'ची चर्चा आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन २ आठवडे होऊन गेले आहेत. दोन आठवड्यांनी चित्रपटाचे कालकेशन घसरले आहे. काल या चित्रपटाने १३.७५ कोटींचे कलेक्शन केले आहे.

यावरून असे स्पष्ट होते की 'गदार २'चा आलेख खाली जात आहे तर 'ड्रीम गर्ल २' आलेख उंचावत आहे.

राज शांडिल्य दिग्दर्शित, ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मानच्या 2019 च्या ड्रीम गर्ल या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. अभिनेत्याने त्याच्या करमची भूमिका पुन्हा साकारली आहे, करमच्या त्याची प्रियसीशी (अनन्या पांडे) लग्न करण्यासाठी भरपूर पैसे कमवण्यासाठी पूजा म्हणून क्रॉस ड्रेस करण्याचा निर्णय घेतो.

ड्रीम गर्ल 2

ड्रीम गर्ल 2 मध्ये परेश रावल, अन्नू कपूर, राजपाल यादव, विजय राज, असरानी, ​​अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंग आणि सीमा पाहवा देखील आहेत. या चित्रपटाचे निर्मिती एकता आर कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे.

एका प्रेस नोटमध्ये, निर्मात्यांनी सांगितले की हा चित्रपट आयुष्मानचा "आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर" ठरला आहे, ज्याने त्याच्या 2019 च्या बाला चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹ 10.15 कोटीचा आकडा कमविला होता. आयुष्मान म्हणाला की, 'ड्रीम गर्ल 2 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली याचा मला आनंद आहे.' (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eduacation News: राज्याच्या ७० आयटीआयमध्ये नवा अभ्यासक्रम; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Shravan 2025: श्रावणात जेवणाची योग्य वेळ कोणती?

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

Chetana Bhat: पानाआड दडलंय सौंदर्य, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

SCROLL FOR NEXT