Brahmastra Sequel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Brahmastra Sequel: ‘ब्रह्मास्त्र’चे पुढचे भाग येणार. एक नव्हे तर दोन.. पण तोपर्यंत तुमचं वय होईल...

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून निर्मात्यांनी चित्रपटाच्या आगामी भागाची घोषणा केली.

Chetan Bodke

Brahmastra Sequel: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. तेव्हापासून चाहते चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीतच, आणखी एक आनंदाची बातमी आहे, चित्रपटाचे निर्माते अयान मुखर्जी यांनी अखेर चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित भागांची तसेच त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

अयानने मंगळवारी सकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये, चित्रपट निर्मात्याने लिहिले, “ब्रह्मास्त्र ट्रायलॉजी, ॲस्ट्राव्हर्स आणि माझ्या आयुष्यावरील काही अपडेट्स शेअर करण्याची वेळ आली आहे. पहिल्या भागावर माझ्या चाहत्यांनी दिलेले प्रेम आणि प्रतिक्रिया पाहिल्यानंतर... मी भाग 2 आणि भाग 3 तयार करण्यास उत्सुक आहे. मला माहित आहे की, पहिला भाग मोठा आणि महत्वाकांक्षी असेल हे मला माहीत आहे! सोबतच ब्रह्मास्त्रचा दुसरा भाग आणि तिसऱ्या भागाची स्क्रिप्ट पूर्ण होण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल! आणि... मी ठरवलं आहे की मी दोन चित्रपट बनवणार आहे... ते ही एकत्र! सोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे, मी चित्रपटाचे दोन्ही पार्ट एकसाथ प्रदर्शित करणार आहे. ते साध्य करण्यासाठी माझ्याकडे एक वेळ आहे, जी मी आज तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे! ‘ब्रह्मास्त्र भाग दोन: देव’ डिसेंबर 2026 मध्ये तर ‘ब्रह्मास्त्र भाग 3’ डिसेंबर 2027 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.”

अयानने पुढे लिहिले, “माझ्याकडे आणखी एक बातमी आहे, ती सुद्धा सांगायची आहे. द युनिव्हर्सने नुकतंच मला एक अतिशय खास संधी भेट दिली आहे, एक अतिशय खास चित्रपट ज्याचे मी दिग्दर्शन करणार आहे. चित्रपट काय आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी योग्य वेळ आल्यावर नक्की देईल. एक संधी जी मला आव्हान देते आणि मला काम करण्यासाठी प्रेरित करते. एक जिथे मी शिकेल, प्रेरणा घेऊन माझं ज्ञान वाढवू शकेल! म्हणून, मी ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे!! या युनिव्हर्समध्ये सर्व सकारात्मक ऊर्जेसाठी स्वत:ला शिकवत मी माझे सर्वोत्तम कार्य करू शकेन आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींमध्ये माझं योगदान देऊ शकेल. इंडियन सिनेमा, लव्ह अँड लाईट, अयान.”

रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र पार्ट २’ मध्ये शिवाच्या भूमिकेत परतणार आहे. रणवीर सिंग देवच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. तथापि, भूमिकेबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT