Athiya Shetty Supports K.L.Rahul After Strip Club Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Athiya Shetty Post: ‘आधी पुरावे दाखवा आणि मग...’ स्ट्रीप क्लब प्रकरणावर आथियाने पतीच्या समर्थनार्थ केलेली पोस्ट चर्चेत

Athiya Shetty Supports K.L.Rahul After Strip Club Viral Video: गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर के.एल.राहुल स्ट्रिप क्लबमध्ये दिसत असल्याची चर्चा सुरू होती. या सर्वांवर अखेर पडदा टाकत आथियाने सोशल मीडियावर शनिवारी संध्याकाळी एक स्टोरी शेअर केली.

Chetan Bodke

Athiya Shetty And KL Rahul Viral Video: बॉलिवूडचं क्यूट कपल आथिया शेट्टी आणि के एल राहूल यांनी जानेवारी महिन्यात लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर के.एल.राहुल स्ट्रिप क्लबमध्ये दिसत असल्याची चर्चा सुरू होती. या सर्वांवर अखेर पडदा टाकत आथियाने सोशल मीडियावर शनिवारी संध्याकाळी एक स्टोरी शेअर केली आहे. राहुलच्या स्ट्रिप क्लबसंबंधितच्या बातम्यांना तिने सोशल मीडियावर धुडकावून लावले आहे.

केएल राहुल सध्या इंग्लंडमध्ये आहे, आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. सध्या त्याच्यावर इंग्लंडमध्ये उपचार सुरू असून तो काही काळ बेडरेस्ट घेणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी लंडनमधील एका क्लबमध्ये केएल राहुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही मीडिया रिपोर्टसने केलेल्या दाव्यांनुसार, राहुल आणि अथिया एका स्ट्रिप क्लबमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. अखेर सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत अथिया शेट्टीने हे वृत्त फेटाळून लावले आहे.

Athiya Shetty Post

लंडनमधील कथित ‘स्ट्रिप क्लब’मधील व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर आथिया शेट्टीने स्पष्टीकरण दिले की, ती, पती केएल राहुल आणि त्यांच्या मित्रांसोबत एका ठिकाणी पार्टीसाठी गेले होते, याविषयी पोस्टमध्ये काही मुद्दे नमुद केले. पोस्ट शेअर करत आथिया म्हणते,“मी सहसा गप्प राहणे पसंत करते आणि प्रतिक्रिया देत नाही, पण कधीकधी स्वतःसाठी उभे राहणे आवश्यक असते. राहुल, मी आणि आमचे मित्र एका ठिकाणी गेलो होतो. उगाचच कोणत्याही गोष्टीचा कुठेही संदर्भ लावणं थांबवा, पहिले तथ्य तपासा आणि मग बोला. शांती आणि प्रेम”

के.एल.राहुल स्ट्रिप क्लबमध्ये असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराटच व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल पत्नी आथिया आणि त्यांच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. सोबतच तो बारबाला महिलांसोबत देखील दिसत आहे. असे त्या व्हिडीओत दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओवरून राहुल तुफान ट्रोल झाला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलने २३ जानेवारी रोजी कुटुंबीय आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील 'जहाँ' या बंगल्यात हे लग्न पार पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT