Athiya Shetty and KL Rahul Saam Tv
मनोरंजन बातम्या

Athiya Shetty and KL Rahul: 'ओह बेबी...'; अथिया शेट्टी आणि केएल राहुलचे क्युट फोटो व्हायरल, फोटोमध्ये केले बेबी बंप फ्लॉन्ट

Athiya Shetty and KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघेही खूप क्युट दिसत आहेत.

Shruti Vilas Kadam

Athiya Shetty and KL Rahul: भारतीय क्रिकेटर के. एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने बुधवारी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले. केएल राहुल आणि अथिया लवकरच त्यांच्या बाळाचे स्वागत करणार आहे. त्याआधी या कपलने त्या दोघांचे काही सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

इंस्टाग्रामच्या पोस्ट त्यांनी १० नवीन फोटो पोस्ट केले आहेत आणि या पोस्टच्या कॅप्शनमध्ये या दोघांनी अनेक गोंडस इमोटिकॉन्स वापरत, 'ओह बेबी' अथिया आणि राहुलने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. दोघांनी जानेवारी २०२३ मध्ये तिचे वडील सुनील शेट्टी यांच्या अलिबाग येथील फार्महाऊसवर लग्न केले. हे दोघेही बीटाउनमधील सर्वात गोड कपलपैकी एक आहेत.

दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या व्यस्त वेळापत्रकानंतर राहुल सध्या अथियासोबत काही वेळ घालवत आहे. रविवारी राहुलने ३३ चेंडूत नाबाद ३४ धावा करत सामना संपवला आणि टीम इंडियाने स्पर्धा जिंकली. संघाचा कर्णधार रोहित शर्माने राहुलच्या फलंदाजी कौशल्याचे आणि मैदानावर निर्भय उपस्थितीची आवश्यकता असलेल्या परिस्थितीत खेळाबद्दलच्या त्याच्या अथक प्रेमाचे कौतुक केले होते .

दरम्यान, अथिया शेट्टी बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तथापि, ती मॉडेल म्हणून ज्या लक्झरी ब्रँडशी संबंधित आहे त्यांचा सक्रियपणे प्रोमोशन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Maharashtra Live News Update: मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

SCROLL FOR NEXT