Siddharth Jadhav SAAM TV
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav : "हा सिनेमा नाही, ही आठवण आहे..."; 'आता थांबायचं नाय'चं यश पाहून सिद्धार्थ जाधव भावुक

Ata Thambaycha Naay : 'आता थांबायचं नाय' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट आहे, जो ५० दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला.

Shreya Maskar

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) कायम त्याच्या अतरंगी स्टाइल आणि हटके अभिनयामुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा 'येरे येरे पैसा ३' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 18 जुलैपासून थिएटरमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात अलिकडेच सिद्धार्थ जाधवचा 'आता थांबायचं नाय' (Ata Thambaycha Naay) चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. 'आता थांबायचं नाय' हा सिद्धार्थ जाधवचा पहिला चित्रपट जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहिला.

सिद्धार्थ जाधवसाठी हा चित्रपट एक प्रवास होता. एका हरवलेल्या बापाचा आणि खऱ्या कलाकाराचा...सिद्धार्थ जाधव चित्रपटाच्या यशावर म्हणाला की, "रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करतोय. सुमित राघवन, दिलीप रावळकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळं मराठी अभिनय सृष्टीचं कुटुंबच जवळ आलं. 25 दिवस, मग 50 दिवस… आणि ते तुफान हाऊसफुल शोज. ती आठवण माझ्या कायम लक्षात राहील."

शेवटी सिद्धार्थ म्हणाला , "हा सिनेमा नाही, ही आठवण आहे आणि ती कायम माझ्या हृदयात राहील..." 'आता थांबायचं नाय' चित्रपटात सिद्धार्थ जाधवने मारुती कदम हे पात्र साकारले होते. जे त्याच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक बाप जो परिस्थितीने हरवलेला आणि मुलीसाठी लढणारा...सिद्धार्थ कॉमेडी भूमिकांमधून या चित्रपटात संवेदनशील पात्रात पाहायला मिळत आहे. चाहते त्याच्या कामाचे कौतुक करत आहे. "हे सिद्धार्थचं सर्वोत्तम काम..." असल्याचे म्हणत आहेत.

'आता थांबायचं नाय' चित्रपट थिएटर गाजवल्यावर आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे. 27 जुलै दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता चित्रपट झी टॉकीजवर पाहता येणार आहे. चाहते यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT