Sushil Kumar predicted death Salman Khan and Shahrukh Khan Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Salman & Shahrukh Khan : शाहरुख खान आणि सलमान खान यांचा एकाच वर्षी मृत्यू? ज्योतिषाच्या दाव्याने खळबळ

Salman Khan & Shahrukh Khan Wiil Die : प्रसिद्ध यूट्यूबर आणि मुलाखतकार सिद्धार्थ कन्नन याच्या मुलाखती नेहमीच चर्चेत असतात. त्याने अलीकडेच ज्योतिषी सुशील कुमार यांची मुलाखत घेतली.

Prashant Patil

मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान हे दोघंही अनेक दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीवर आणि आपल्या चाहत्यांवर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई होत असते. मात्र, आता एका प्रसिद्ध ज्योतिषाने या दोघांच्या भविष्यासंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. या ज्योतिषाने त्यांच्याबाबत केलेल्या भविष्यवाणीमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

प्रसिद्ध यूट्यूबर आणि मुलाखतकार सिद्धार्थ कन्नन याच्या मुलाखती नेहमीच चर्चेत असतात. त्याने अलीकडेच ज्योतिषी सुशील कुमार यांची मुलाखत घेतली. सुशील कुमार हे ज्योतिषशास्त्र तसेच नाडी शास्त्राचे अभ्यासक असल्याचं सांगितले जातं. या मुलाखतीत त्यांनी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या आयुष्याविषयी धक्कादायक विधान केलं आहे.

सलमान खान यांच्यासाठी सध्या प्रतिकूल काळ सुरू आहे, तर शाहरुख खान यांचं आयुष्य स्थिर आहे. मात्र, भविष्यात सलमान खान एका गंभीर आजाराला सामोरे जातील. हा आजार त्यांना शेवटच्या काळात खूप त्रासदायक ठरणार आहे. मी यापूर्वीही याविषयी अनेक वेळा इशारा दिला आहे. सुशील कुमार यांनी याच मुलाखतीत आणखी धक्कादायक दावा केला. ते म्हणाले, सलमान खान आणि शाहरुख खान यांचं आयुष्य केवळ ६७ वर्षे इतकेच आहे. दोघेही वयाच्या ६७व्या वर्षीच निधन पावतील आणि विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूचं वर्षही एकच असेल. ज्योतिषशास्त्राच्या विद्या वापरून मृत्यूची अचूक भविष्यवाणी करता येते, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद कोणता? जाणून घ्या खास नैवेद्याची संपूर्ण यादी

Ganesh Chaturthi 2025 : सुखकर्ता, दु:खहर्ता...; गणपतीच्या 'या' ५ आरत्या आताच करा तोंडपाठ

Supreme Court : सावधान! तुम्हीही कार-बाइकमध्ये 'हे' पेट्रोल टाकताय? प्रकरण थेट SC पर्यंत पोहोचलं

Maharashtra Live News Update: मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये उद्या मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक सभा

Modak Name Meaning: गणपतीला आवडणारे 'मोदक' हे नाव कसं पडलं? जाणून घ्या नावामागचा खरा इतिहास

SCROLL FOR NEXT