Milind Soman Instagram @milindrunning
मनोरंजन बातम्या

Milind Soman: मिलिंद सोमणचे ८ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन, पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

अॅक्शन थ्रिलर 'लकड़बग्घा' चित्रपटामधून मिलिंद सोमण पुनरागमन करत आहे.

Pooja Dange

Milind Soman Upcoming Movie: मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण नेहमीच चर्चेत असतात. मिलिंद सोमणच्या फिटनेसला तोड नाही. मिलिंद त्यांच्या फिटनेसवर आणि आहारावर नेहमीच भर देतात. मिलिंद सोमण आपल्याला असाच एका फिट इन्स्ट्रक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जानेवारी, २०२३ला प्रदर्शित होणार आहे.

संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये अभिनेते मिलिंद सोमण दिसले होते. जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार्‍या अॅक्शन थ्रिलर 'लकड़बग्घा' चित्रपटामधून ते पुनरागमन करत आहे.

'लकड़बग्घा' हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असून भूतदयेविषयी जागरूकता निर्माण करणार भारतातील पहिला चित्रपट आहे. मिलिंद सोमण, अंशुमन झा आणि रिद्धी डोगरा स्टारर 'लकड़बग्घा' हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अर्जुन कपूरचा 'कुत्ते' चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Movie)

'लकड़बग्घा' चित्रपटाविषयी बोलताना मिलिंद सोमण म्हणाले, “'लकड़बग्घा'सारख्या वेगळ्या अॅक्शन चित्रपटाचा भाग बनणे खूप रंजक आहे. कथेचा आणि पात्रांचा प्रत्येक पैलू खूप वेगळा विचार करण्यात आला आहे. क्राव मागाचा एक रंजक मार्शल आर्ट फॉर्म म्हणून, स्क्रिप्टमध्ये समाविष्ट केले आहे जे मला खूप आवडले. अंशुमनने क्राव मागाचे प्रशिक्षण घेतले आहे आणि या मार्शल आर्टला दाखविण्यासाठी खास कोरिओग्राफी तयार करण्यात आली आहे. (Celebrity)

मी मार्शल आर्ट्स इन्स्ट्रक्टर आणि अंशुमनच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. भावुक लोकांसोबत काम कार्याला मला नेहमीच आवडते. असे पात्र मी यापूर्वी कधीही साकारले नव्हते - एक बंगाली वडील आणि मार्शल आर्ट ट्रेनर, हे करताना खूप मजा आली."

व्हिक्टर मुखर्जी यांनी लकड़बग्घा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. फर्स्ट रे फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात हडपसर येथील भीषण आगीत १९ झोपड्या जळून खाक

Rahul Gandhi: राहुल गांधींना मोठा दिलासा, जामीनदार बदलला; भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खळबळजनक अपडेट | VIDEO

Ranveer Singh Case: रणवीर सिंगला धमकी प्रकरणात मोठी कारवाई; लॉरेन्स गँगच्या हॅरी बॉक्सरवर लूकआउट नोटीस

Gold Mangalsutra Designs: सोन्याचे मंगळसूत्र बनवताय? हे आहेत ट्रेडिंग डिझाईन्सचे 5 लॉकेट

SCROLL FOR NEXT