Ashok Saraf Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf: 'डबल मिनिंग जोक्स दीर्घकाळ चालत नाही...'; अशोक मामांचा दादा कोंडकेंच्या विनोदावर टोला

Ashok Saraf: अशोक सराफ यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात त्यांनी दादा कोंडकेंच्या विनोदशैलीवर भाष्य केले. डबल मिनिंग विनोद दीर्घकाळ टिकत नसल्याचे सांगत अभिनयातील निरीक्षणाचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

Shruti Vilas Kadam

Ashok Saraf: मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांचा नागरी सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. नागपूरमधील वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या सोहळ्यात अशोक सराफ यांची प्रकट मुलाखतही आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोती यांनी घेतलेल्या या मुलाखतीत सराफ यांनी आपल्या अभिनय प्रवासासह अनेक विषयांवर दिलखुलास भाष्य केले.

यावेळी अशोक सराफ यांनी दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या विनोदशैलीवरही भाष्य केले. दादा कोंडके यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात अशोक सराफ यांना चित्रपटात मोठी संधी दिली होती. दादांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये लोककलांना अनुसरून उत्स्फूर्त आणि सहज विनोद पाहायला मिळायचा. मात्र, पुढे दादा कोंडके यांच्या चित्रपटांमध्ये डबल मिनिंग विनोद वाढू लागल्यानंतर आपण त्यांच्या चित्रपटांपासून दूर झाल्याचे सराफ यांनी स्पष्ट केले.

‘विनोद सकस असावा’

विनोद सकस असावा. डबल मिनिंग विनोद दीर्घकाळ चालत नाही. दादा कोंडकेंनी डबल मिनिंग विनोदाचा वापर करूनही चित्रपट यशस्वी करून दाखवले. मात्र, एखाद्या कलाकृतीला यश मिळाले की तिच्यातील अनेक गोष्टी झाकल्या जातात, असेही त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.

अभिनय आणि विनोद करताना केवळ काय करायचे याचा विचार न करता काय करायचे नाही आणि कुठे थांबायचे, हे समजणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सराफ यांनी सांगितले. विनोद पसरट न करता नेमका आणि परिणामकारक असला पाहिजे. त्यासाठी अभिनयातील बारकावे समजून घेणे आणि त्याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निरीक्षणातून शिकलो अभिनय

अभिनय शिकण्यासाठी वाचनापेक्षा निरीक्षणाला अधिक महत्त्व मी दिले. आपल्या मामांची नाटक कंपनी होती. तिथेच मी कलाकारांच्या प्रत्यक्ष कृतीतून अभिनय समजून घेतला. अभिनय केवळ शिकवून येत नाही, तर तो पाहून, निरीक्षण करून आत्मसात करावा लागतो. थेट शिकवलेला अभिनय नक्कल ठरू शकतो हा महत्वाचा सल्ला देखील मला तिथे शिकायला मिळाला, असेही अशोक सराफ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT