Ashok Mama SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Mama: अशोक मामांसमोर येणार अनिश-भैरवीच्या लग्नाचं खरं सत्य? पाहा VIDEO

Ashok Mama Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळत आहे. अनिश-भैरवीच्या लग्नाचं सत्य लवकरच अशोक मामांसमोर येणार आहे.

Shreya Maskar

'अशोक मा.मा.' (Ashok Mama) मालिका दिवसेंदिवस अधिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. रोज या मालिकेत नवीन एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 'अशोक मा.मा.' मालिकेत सध्या एकामागोमाग एक धक्कादायक वळणं येताना दिसत आहेत. अर्जुन बेलवलकरच्या एन्ट्रीनंतर मालिकेत हास्याचा तडका आणि उत्सुकता पाहायला मिळत आहे. 'अशोक मा.मा.' मालिकेत अर्जुन बेलवलकर ची एन्ट्री झाल्यापासून बऱ्याच मजेशीर घटना घडत आहेत.

'अशोक मा.मा.' मालिका मालिकेत नवीन एन्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेतील पात्र आता खुलताना दिसत आहेत. अर्जुनने राधाची फिरकी घेण्याची संधी देखील सोडली नाही आहे. अर्जुनच्या एन्ट्रीमुळे मालिकेत खूप बदल होताना दिसत आहेत. आता मात्र मालिकेत एक अनोखे वळण येणार आहे ज्यामुळे अनिश - भैरवी आणि मामाच्या नात्यात काय बदल होतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'अशोक मा.मा.' मालिकेच्या कथानकाला एक गंभीर वळण मिळताना दिसत आहे. भैरवी सध्या अनिशसोबत लग्नाच्या निर्णयावर संभ्रमात आहे. ती अर्जुनकडे सल्ला मागते. पण जेव्हा ती अर्जुनला आमचे Contract Marriage असल्याचे सांगते. तेव्हा त्याला देखील धक्का बसतो. भैरवी अर्जुनकडे तिच्या नात्याचे सर्व सत्य उघड करते. भैरवी त्याला Contract Marriage चे सत्य सांगते. आता हे सत्य अशोक मामांसमोर येणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

'अशोक मा.मा.' मालिकेत अनिश - भैरवीच्या लग्नाचे सत्य अशोक मामांना समजताच त्यांची यावर प्रतिक्रिया कशा असले? मालिकेत पुढे काय घडेल? हे सर्व पाहणे मनोरंजक आहे. 'अशोक मा.मा.' ही मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

Gold Price Today : आज चांदी स्वस्त! सोन्याचे दर वाढले की घसरले? सुवर्णनगरीतील ताजे भाव जाणून घ्या

Shocking : भयंकर! बायको-पोरांसह ६ जणांची हत्या, आरोपीनं अख्ख्या कुटुंबाला संपवलं, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT