Ashish Vidyarthi Wedding Wife Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashish Vidyarthi On Trollers: 'हे खूप अनपेक्षित होतं..' आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Ashish Vidyarthi - Rupali Barua: आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यावर्षी लग्नबंधनात अडकले.

Pooja Dange

Ashish Vidyarthi - Rupali Barua Reacted On Negative Comment:

बॉलिवूडमधील खलनायक आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी दुसरे लग्न केले. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यावर्षी जूनमध्ये लग्नबंधनात अडकले. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थित पारंपारिक पद्धतीत आशिष आणि रुपाली यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ अनेकदा ट्रोल झाले आहेत.

आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. बिहाइंडवूड्सशी बोलताना आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी ट्रोलिंग आणि नेगेटिव्ह कमेंट यावर त्यांचे मत व्यक्त केले आहे.

आशिष विद्यार्थी यांची पत्नी रुपाली बरुआ यांना नेगेटिव्ह कमेंटविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, 'मी याकडे लक्ष देत नाही. कारण मी त्या लोकांना ओळखत नाही. त्यांनी जे पहिले आहे ते सामान्य लोकांसाठी खूप अनपेक्षित आहे. त्यांना याविषयी काहीच माहित नाही.

मला लोकांना कोणतेही स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही. या सगळ्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. मी जास्त कमेंट वाचत नाही. माझ्या जवळचे लोक मला सपोर्ट करतात. हे माझ्यासाठी खूप आहे.' (Latest Entertainment News)

आशिष विद्यार्थी ट्रोलिंगविषयी बोलताना म्हटले की, 'प्रेम आणि स्नेह या दोन गोष्टी आहेत. तुम्हाला कोणतीच गोष्ट सिद्ध करण्याची गरज नाही. आम्ही दोघे तिथे कोणालाही कोणतीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी तिथे नव्हतो. चिंता करू नको, रागावू नका असं काहीतरी करा ज्याने तुम्हाला आनंद मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

SCROLL FOR NEXT