Deepika Padukone Saam TV
मनोरंजन बातम्या

'ब्रह्मास्र'नंतर आता 'ब्रह्मास्त्र २' मध्ये असणार दिपीका पदुकोण? अयान मुखर्जीने मौन सोडत दिली 'ही' प्रतिक्रिया

अयान मुखर्जीने 'ब्रह्मास्त्र'च्या दुसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी दीपिका पदुकोणशी संपर्क साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सुपरहिट चित्रपट 'ब्रह्मास्त्र' मुळे चर्चेत आहेत. ९ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केली आहे. चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर आता प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. आता या चित्रपटाविषयी माहिती समोर आली आहे. अलिकडेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे असे बोलले जात होते. परंतु, नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने मौन तोडत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माहितीनुसार, अयान मुखर्जीने 'ब्रह्मास्त्र'च्या दुसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी दीपिका पदुकोणशी संपर्क साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आगामी भागात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसऱ्या भागातील अमृताच्या व्यक्तिरेखेसाठी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटात शिवाला (रणबीर कपूर) घेतलेली महिला अमृता आहे. ती दिपिका पदुकोण असल्याचे सर्वांचे मत आहे. विशेष म्हणजे अमृता ही शिवाची आई आहे. आता यावर दिग्दर्शक अयानने 'अंधारात एक सावली दिसते आहे आणि ही सावली कोणाचीही सावली असू शकते' असं म्हटलं आहे.

अलीकडेच एका मुलाखतीमध्ये, दिग्दर्शक अयान मुखर्जीने 'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या भागावर आणि दीपिकाच्या कॅमिओवर प्रतिक्रिया दिली. त्याने ' चित्रपटातील एका सिनबद्दल प्रेक्षकांच्या मनात जो भ्रम आहे की ती दिपीका पदुकोण आहे. ते दृश्य गडद आहे आणि त्यात पात्राचा चेहरा स्पष्टपणे दाखवलेला नाही. असं सागितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT