आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर Saam Tv
मनोरंजन बातम्या

आर्यन खानचा कोठडीतला मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर

बुधवारी कार्डिलिया क्रूझ प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला विशेष एनडीपीएस न्यायालयाचे व्हि व्हि पाटील न्यायमूर्तींनी जामीन नाकारला आहे.

सूरज सावंत

मुंबई - गेल्या जवळपास १५ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानचा तुरुंगवास अद्याप संपायची चिन्ह दिसत नाही आहे. क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी कार्डिलिया क्रूझ प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला विशेष एनडीपीएस न्यायालयाचे व्हि व्हि पाटील न्यायमूर्तींनी जामीन नाकारला आहे.

हे देखील पहा -

त्यानंतर आर्यनच्या वकिलांमार्फत तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तसेच, यासंदर्भातली सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी पुढची तारीख दिल्यामुळे आर्यनचा मुक्काम वाढला आहे. आर्यनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावनीबाबत मागणी केली मात्र न्यायालयाने मंगळवारी सुनावणीची तारीख दिली आहे. मुंबई हाय कोर्टात ही सुनावनी होणार असून मंगळवारी मुनमुन धामेचाच्या जामीनावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता. सकाळी ९.१५ च्या दरम्यान शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता. कोरोना काळात जेल बंद असल्याने नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. नातेवाईकांना आता कैद्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. २ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Viral monkey Punch: आईनंच चिमुकल्याला दूर केलं; माकडानं शोधली बाहुल्यात मायेची उब

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! १४ हजार लिटर पेट्रोल डिझेलचा ट्रक उलटला अन्...

Drinking water after meals: जेवणानंतर लगेच पाणी पिताय? वाचा तुमची ही सवय आरोग्यासाठी किती ठरतेय धोकादायक

Breaking : शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुन्हा रूग्णालयात दाखल करणार

SCROLL FOR NEXT