Aryan Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: 'बोल्ड आणि ब्युटीफुल' अभिनेत्रीला करतोय आर्यन खान डेट? दुबईतल्या 'त्या' फोटोंवरून बोंबाबोंब

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अभिनेत्री नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुबंई : बॉलिवूडचे सेलिब्रिटी हे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं कायमच प्रकाशझोतात असतात. आता अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अभिनेत्री नोरा फतेही ला डेट करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर या दोंघाच्या नात्याबद्दल अनेक अटकळ्या लावल्या जात आहे. अलिकडेच आर्यन खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचं वर्तवण्यात आलं होतं.

सोशल मीडियावर सेलिब्रिटीचे प्रेम प्रकरण वाऱ्यासारखे पसरत असते. सोशल मीडियावर आर्यन आणि नोरा या दोघांचे फोटो देखील तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये आर्यन आणि नोरासोबत त्याचे अन्य मित्र देखील दिसत आहेत. पण आर्यन आणि नोरा यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आर्यन खान त्याच्या कार्डिंक ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या मागील काही दिवसापासून चर्चेत आहेत. आता पु्हा एकदा आर्यन खानला नेटकऱ्यानी नजरेस धरले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक कलाकार हे दुबईला गेले होते. नोरा आणि आर्यन देखील दुबईला गेले होते. यावेळी त्यांनी तेथे फोटो काढले. मात्र सोशल मीडियावर काही फोटो शेअर झाले आहेत. या फोटोंवरुन आर्यन नोराला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.सोशल मीडियावर या दोघांच्या फोटोंवर नेटकऱ्यानी कमेंट्सचा भडीमारा सुरू आहे.

आर्यन आणि नोरा यांच्या कामाविषयी बोलयाचे, तर नोरा आगामी काळात १०० पर्सेंट या चित्रपटात दिसणार आहे. तर आर्यन खान हा दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची सगळेजण वाट पाहत आहेत.अलिकडेच त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्क्रिप्टचे काम झाले असल्याचे सांगितले होते.

Edited By- Manasvi Choudhary

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

स्थानिक भाजपला शिंदेसेना नको, भाजपचे मंडळाध्यक्ष इरेला पेटले

नागपुरात पाण्याच्या टाकीचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू, दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

Warm Water Benefits: जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

SCROLL FOR NEXT