Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : 'तुला घाणेरड्यासारखं राहायला आवडते तर...', जान्हवी का भडकली आर्यावर?

Bigg Boss Marathi Day 45 : बिग बॉस घरात आता आर्या आणि जान्हवीमध्ये राडा होताना पाहायला मिळाला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होत जात आहे. पहिल्या दिवसापासून घरात कोणाची ना कोणाची भांडणे होताना पाहायला मिळत आहे. बिग बॉस घरात रोज एक नवा राडा ठरलेला असतो. नुकताच 'बिग बॉस मराठी' च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी (Janhvi Killekar) आणि आर्या (Arya Jadhav) भांडताना दिसत आहेत.

बिग बॉस घरातील (Bigg Boss Marathi) वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. छोट्या छोट्या गोष्टी येथे मोठ्या वादात रूपांतरित होतात. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात तुम्हाला आर्या आणि जान्हवीचं कडाक्याचे भांडण पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, जान्हवी आर्याला म्हणते, "तुला वॉशरुम साफ करता येत नाही, भांडी घासता येत नाही, मग करता काय येतं तुला?" त्यावर आर्या जान्हवीला बोलते, "तू स्वत: पहिलं क्लिन कर" यावर जान्हवी पुढे बोलते की, "मला चूक दिसली तर दिसली आर्या, तुला घाणेरड्यासारखं राहायला आवडतं तर घाणेरड्यासारखचं राहा". अशा भाषेत आर्या आणि जान्हवीमध्ये भांडण होते.

आज बिग बॉसच्या एपिसोडमध्ये तुम्हाला पुन्हा घरात आवाज चढल्याचे पाहायला मिळणार आहे. आर्या आणि जान्हवीमध्ये वाद झाला आहे. बिग बॉसचे चाहते घरात नेमकं काय होत हे जाणून घेण्यासाठी नेहमी आतुर असतात. या सीझनची जोरदार चर्चा पाहायला मिळते. प्रत्येक जण नवीन गेम प्लान करताना आपल्याला दिसतो. दोन सख्खे मित्र कधी वैरी होतील हे बिग बॉसच्या घरात सांगता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT