Malaika- Arjun Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika- Arjun Video : ‘ब्रेकअप कन्फर्म...’ अर्जुन-मलायकाने भर कार्यक्रमात एकमेकांना केलं दुर्लक्ष; व्हिडीओ पाहून चाहते हैराण

Malaika- Arjun Video : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कायमच रिलेशनमुळे चर्चेत राहतात. गेल्या काही दिवसांपासून हे कपल ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.

Chetan Bodke

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कायमच रिलेशनमुळे चर्चेत राहतात. गेल्या काही दिवसांपासून हे कपल ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या एका फॅशन इव्हेंटमध्ये ते दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. दोघेही या इव्हेंटमध्ये आले असले तरीही ते एकत्र बसले नव्हते. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चांगलीच चर्चा होत आहे. फॅशन इव्हेंटमधील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

विरल भयानी, या पापाराझी इन्स्टा पेजवरून सध्या काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, मलायका आणि अर्जुन दोघेही पहिल्याच रोमध्ये वेगवेगळे बसलेले दिसत आहेत. पण दोघांनीही एकमेकांना पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांकडून त्यांचा ब्रेकअप झाल्याचे कन्फर्म केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मलायका- अर्जुन मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्यावेळी त्यांच्यात आलबेल असल्याचं दिसलं.

पण आता या फॅशन इव्हेंटमधील व्हिडिओ पाहून, नेटकऱ्यांमध्ये मलायका- अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा जोर धरत आहे. अर्जुननंतर मलायकानेही इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. तेव्हापासून दोघांच्याही ब्रेकअपच्या चर्चा जोरदार होत होत्या. या फॅशन इव्हेंटसाठी मलायका आणि अर्जुनने खास लूक कॅरी केलेला होता. मलायकाने व्हाईट कॉ- ऑर्ड सेट वेअर केला होता. तर अर्जुन ब्लॅक शेरवानी आणि धोती कॅरी केली होती.

कायमच वयावरून ट्रोल होणारं हे कपल सध्या एकमेकांकडे कमालीचं दुर्लक्ष करत आहे. ‘म्हणजेच दोघांचं ब्रेकअप कन्फर्म आहे’, ‘आधी दोघांनी आपआपसात ठरवा आणि मग ब्रेकअप की पॅचअप ? निर्णय घ्या’, ‘घटस्फोटाचं नेमकं कारण काय?’ असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी दोघांनाही विचारले. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून व्हिडिओवर अनेक कमेंट्सही येत आहेत.

गेल्या सात वर्षांपासून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत होते. २०१८ मध्ये, मलायकाच्या ४५ व्या वाढदिवशी दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. यापूर्वीही अनेकदा मलायका आणि अर्जुनच्या घटस्फोटाच्या चर्चा झालेल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर मलायका आणि अर्जुनच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होत आहे. मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. त्यांना अरहान नावाचा मुलगाही आहे. जो मलायकासोबत राहतो. अरबाजने गेल्या काही दिवसांपूर्वी शुरा खानसोबत दुसरं लग्न केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT