Arijit Singh Third Popular Singer On Spotify Saam TV
मनोरंजन बातम्या

Arijit Singh News : अरिजित सिंगला झालंय तरी काय ? सर्व लाईव्ह शोज केले कॅन्सल; चाहते चिंतेत

Arijit Singh Announces Postponement Of UK Tour : लोकप्रिय गायक अरिजीत सिंगला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याची फक्त भारतातच नाही तर जगभरात तगडी फॅन फॉलोइंग आहे.

Chetan Bodke

लोकप्रिय गायक अरिजीत सिंगला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याची फक्त भारतातच नाही तर जगभरात तगडी फॅन फॉलोइंग आहे. जगभरात त्याचे चाहते असल्यामुळे त्याचे परदेशातही म्युझिक कॉन्सर्ट होत असतात. त्याचा नुकताच ब्रिटनमध्ये म्युझिक कॉन्सर्ट होता. पण अरजितचा हा म्युझिक कॉन्सर्ट रद्द झाला आहे. अरजित सिंगने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्युझिक कॉन्सर्ट रद्द करण्याचे कारण सांगितले आहे.

अरिजीत सिंगचा ब्रिटनमध्ये एक म्युझिक कॉन्सर्ट होणार होता. पण तो रद्द झाला आहे. अरिजितने म्युझिक कॉन्सर्ट रद्द होण्याचे कारण पोस्ट शेअर करत सांगितले. पोस्टमध्ये अरिजीत सिंग म्हणतो, "चाहत्यांनो मला सांगताना अत्यंत दु:ख वाटत आहे की, काही कारणास्तव मला वैद्यकीय उपचारांची गरज असल्यामुळे ऑगस्टमध्ये होणारा कॉन्सर्ट पुढे ढकलला जात आहे. मला माहित आहे की तुम्ही या कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहत होते. शो पुढे ढकलल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. तुमचे प्रेम आणि पाठिंबा सदैव माझ्या पाठीशी राहू देत."

शिवाय त्याने पुढे ढकलेले शो केव्हा होणार ? याचीही माहिती दिली आहे. लंडन १५ सप्टेंबर, बर्मिंगहॅम १६ सप्टेंबर, रॉटरडॅम १९ सप्टेंबर, मँचेस्टर २२ सप्टेंबरला अरिजीतचे म्युझिक कॉन्सर्ट होणार आहेत. अरिजितला नेमकं काय झाले? याबद्दलची माहिती काही मिळालेली नाही. अरिजीतची पोस्ट पाहून चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यास सांगितले आहे. अरिजित सिंह बॉलिवूडमध्ये सर्वात महागड्या गायकांपैकी एक आहे. गेले अनेक वर्षे ते चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT